नांदेड-घुुरखेडा रस्त्याच्या दुरवस्थेने शेतकऱ्यांचे हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2020 03:51 PM2020-10-18T15:51:15+5:302020-10-18T15:52:00+5:30
नांदेड- घुुरखेडा या तीन किलोमीटर लांबीच्या शेती शिवारातून जाणाºया रस्त्याची मोठ्या प्रमाणावर दुर्दशा झालेली आहे.
नांदेड, ता.धरणगाव : नांदेड- घुुरखेडा या तीन किलोमीटर लांबीच्या शेती शिवारातून जाणाºया रस्त्याची मोठ्या प्रमाणावर दुर्दशा झालेली आहे. परिणामी शेतकऱ्यांना खराब रस्त्यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
नांदेडपासून तीन किलोमीटर अंतरावर तापी नदीच्या काठी घुरखेडा हे गाव होते. पण सद्य:स्थितीत गाव ओसाड पडले आहे. तेथे कोणीही राहत नाही. हा भाग आता घुरखेडा शेती शिवार म्हणून ओळखला जातो. या भागाकडे जाणारा संपूर्ण रस्ता काळ्या मातीचा आहे. पावसाळ्याच्या दिवसात चिखलामुळे तर हिवाळा व उन्हाळ्याच्या दिवसात रस्त्यावरील मोठमोठ्या खड्ड्यांमुळे शेतमालाची वाहतूक करताना शेतकºयांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. केळी व उस या पिकांच्या वाहतुकीच्या वेळी तर शेतकºयांना स्वखर्चाने रस्त्यावर पिवळी माती टाकून रस्त्यावरील खड्डे बुजवावे लागतात. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मतदारसंघातील हा भाग आहे. यामुळे त्यांनी लक्ष घालून रस्त्याचे खडीकरणाचे काम करून शेतकरी वर्गाची रस्त्याची ही समस्या सोडवावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.