बोदवड शहरातील रस्त्यांची स्थिती बिकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2020 04:21 PM2020-08-20T16:21:37+5:302020-08-20T16:23:12+5:30

पाणीपुरवठा योजनेसाठी खोदलेले खड्डे ठेकेदाराने व्यवस्थित न बुजल्याने त्यात पुन्हा ट्रॅक्टर फसल्याची घटना बुधवारी घडली.

The condition of roads in Bodwad city is critical | बोदवड शहरातील रस्त्यांची स्थिती बिकट

बोदवड शहरातील रस्त्यांची स्थिती बिकट

Next
ठळक मुद्देबाजार समितीसमोर पुन्हा ट्रॅक्टर फसलेपाणीपुरवठा योजनेचे खड्डे व्यवस्थित न बुजल्याने उद्भवला प्रसंग

बोदवड, जि.जळगाव : पाणीपुरवठा योजनेसाठी खोदलेले खड्डे ठेकेदाराने व्यवस्थित न बुजल्याने त्यात पुन्हा ट्रॅक्टर फसल्याची घटना बुधवारी घडली.
शहरातील रस्त्यांची स्थिती पार बिकट झाली आहे. पावसाच्या पाण्यामुळे तर चक्क कॉलनीवासीयांचे हाल होत आहेत.
शहरातील बाजार समितीच्या गेटजवळ दोन दिवसांपूर्वी ट्रॅक्टर फसले होते. बुधवारी पुन्हा याच रस्त्यावर पाणीपुरवठा योजनेच्या पाईपलाइनचे काम करणाऱ्या ठेकेदाराने व्यवस्थित खड्डे न बुजल्याने या खड्ड्यात ट्रॅक्टर फसले. ट्रॅक्टर काढण्यासाठी बरीच कसरत करावी लागली. तसेच शहरातील रूपनगरमध्येसुद्धा मोठ्या प्रमाणावर रस्ता खराब झाला आहे. यात मोठमोठे खड्डेही पडले आहेत,तर यात दुचाकीस्वारही पडत आहे.
१९ रोजी या भागातील रहिवासी दीपक जैन यांच्यासह अन्य नागरिकांनी नगरपंचायत ला निवेदन दिले असून रस्ता तयार करून देण्याची मागणी केली आहे,
 

Web Title: The condition of roads in Bodwad city is critical

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.