पतसंस्थेच्या कजर्दार महिलेस सशर्त जामीन
By admin | Published: April 11, 2017 12:22 AM2017-04-11T00:22:28+5:302017-04-11T00:22:28+5:30
सर्वस्तरातून अटकेचा निषेध : राजकीय दबावाची चर्चा, न्यायालयात गर्दी
जामनेर : सुरेशदादा जैन पतसंस्थेच्या कजर्दार महिला सरोज पवन राका यांना पोलिसांनी सोमवारी न्यायालयात हजर केले असता न्या.एस.एम.ए. सैयद यांनी जामीन मंजूर केला असून, प्रत्येक रविवारी पोलीस ठाण्यात येऊन हजेरी देण्याचे आदेश दिले.
पतसंस्थेने बेकायदेशीर, विनातारण व आवाक्याबाहेर कर्ज दिले, कजर्दारांनी वेळेवर कर्ज फेडले नाही, अशा स्वरूपाची तक्रार अॅड. कृष्णा बनकर व इतर तिघांनी सहायक निबंधक व पोलिसांकडे 10 महिन्यांपूर्वी केली होती. या तक्रारीवरून पोलिसांनी चौकशी केली. तद्नंतर लेखापरीक्षक दीपक अट्रावलकर यांच्या फिर्यादीवरून 18 संचालकांसह 15 कजर्दार व पतसंस्थेतील शाखा व्यवस्थापक अशा 35 जणांवर 29 जुलै 2016 रोजी गुन्हा दाखल झाला होता. गुन्ह्यातील संशयितांनी अटकपूर्व जामिनासाठी केलेले अर्ज मंजूर झाल्यानंतर संचालक मंडळाने याचिकेद्वारे हा गुन्हा राजकीय दबावाखाली व आकसापोटी असल्यामुळे एफआयआर रद्द करण्याची मागणी केली होती. तसेच कजर्दारांनीदेखील आम्ही थकीत रक्कम भरल्याने आमच्यावरील गुन्हा रद्द करण्याची मागणी उच्च न्यायालयात केली होती. याचिकेचा निकाल लागेर्पयत पोलिसांचा तपास मध्यंतरी थंडावला होता. काही दिवसांपूर्वी उच्च न्यायालयाने यातील काही याचिका फेटाळल्या, तर काहींनी आपल्या याचिका मागे घेतल्या.
आता पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केल्यानंतर फिर्यादी अट्रावलकर यांच्या घेतलेल्या जबाबानुसार रविवारी सरोज पवन राका या कजर्दार महिलेस अटक केली. ही अटक नेमकी महावीर जयंतीदिनी झाल्याने जैन समाज बांधवांमध्ये संताप निर्माण झाला. राका यांच्या अटकेच्या निषेधार्थ रविवारी रात्री जैन समाजातील सर्व महिला मंगल कार्यालयात सुरू असलेले धार्मिक कार्यक्रम सोडून पोलीस ठाण्यात पोहोचल्या. अहिंसक मार्गाने निषेध करीत समाज बांधवांनी पोलीस ठाणे आवारात णमोकार मंत्राचा जप सुरू केला. उशिरा रात्री उपविभागीय पोलीस अधिकारी केशव पातोंड येथे आल्यानंतर समाजाच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेऊन केली गेलेली अटकेची कारवाई अयोग्य असल्याचे सांगितले. मात्र पोलीस अधिकारी आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने रात्री दीड वाजता जमाव माघारी परतला.
कजर्दार महिला सरोज राका यांच्या अटकेच्या निषेधार्थ रविवारी रात्री राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना व संभाजी ब्रिगेडच्या पदाधिका:यांनी ही कारवाई राजकीय दबावाखाली होत असल्याचा आरोप केला होता. सोमवारी दिवसभर याचीच शहरात चर्चा सुरू होती. ही कारवाई कुणाच्या सांगण्यावरून झाली, हे सर्वश्रुत आहे. पोलिसांवर राजकीय दबाव कुणाचा याची चर्चा सुरू होती.
महावीर जयंतीच्या पवित्र दिनी धार्मिक कार्यक्रम सुरू असताना महिलेस किरकोळ स्वरूपाच्या गुन्ह्यात अटक करणे अयोग्य आहे. राजकीय दबावाखाली झालेल्या या कारवाईचा निषेध करतो.
-प्रा.शरद पाटील, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष, जामनेर
अल्पसंख्याक समाजाच्या महिलेवर गुन्हा दाखल होताच अटकेची कारवाई करणा:या पोलिसांनी या प्रकरणातील मोकाट फिरणा:यांना अटक करण्याची हिंमत दाखवावी. राजकीय दबावाखाली होत असलेली कारवाई निषेधार्थ असून, पोलीसदेखील दबावाखाली काम करीत असल्याचे स्पष्ट झाले. -प्रदीप लोढा, जि.प. माजी सदस्य, पहूर
हा प्रकार नाक दाबून तोंड उघडण्याचा प्रयत्न होता. परंतु आम्हाला न्यायदेवतेवर पूर्ण विश्वास होता. शेवटी सत्याचा विजय झाला.
-पवन मूलचंद राका (कजर्दार महिला सरोज राका यांचे पती)