जळगाव जिल्ह्यात मंगल कार्यालय सुरु करण्यास सशर्त परवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2020 12:58 PM2020-06-25T12:58:25+5:302020-06-25T12:59:10+5:30
प्रतिबंधित क्षेत्रात बंदी कायम
जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केवळ ५० जणांच्या उपस्थितीत लग्नसोहळ््यांना परवानगी देण्यात आली असून आता पावसाळ््यामुळे मंगल कार्यालयदेखील सशर्त सुरू करण्यास परवानगी देण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी काढले आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यापासून लग्नसोहळ््यांवर बंदी घालण्यासह खुले लॉन्स, मंगल कार्यालय, हॉल, सभागृहदेखील बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र केवळ ५० जणांच्या उपस्थितीत लग्न सोहळे करण्यास राज्य सरकारने ३१ मे रोजीच्या आदेशात परवानगी दिली. मात्र ते कोठे पार पडतील याचा उल्लेख नव्हता. त्यात आता पावसाळा सुरू झाल्याने लग्न सोहळ््यांसाठी खुले लॉन्स, विनावातानुकुलीत मंगल कार्यालय, हॉल, सभागृह सुरू करण्यास परवानगी देण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी राऊत यांनी २४ रोजी काढले. मात्र प्रतिबंधित क्षेत्रातील अशा सभागृहांना परवानगी राहणार नसल्याचेही स्पष्ट केले आहे.
वºहाडींचे द्यावे लागणार आधार कार्ड
विवाह सोहळ््यासाठी केवळ ५० जणांना परवानगी राहणार आहे. यात जे वºहाडी येतील त्यांचे आधार कार्ड व इतर माहिती लग्न सोहळ््याची परवानगी घेताना सादर करावी लागणार आहे. यात जे वºहाडी प्रतिबंधित क्षेत्रातील असतील त्यांना परवानगी नाकारण्यात यावी, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहे. महापालिका क्षेत्रात मनपा आयुक्त तर महापालिका क्षेत्र वगळून इतर क्षेत्रात कार्यकारी दंडाधिकारी, इन्सिडेंट कमांडर परवानगी देणार आहे.