कलेक्टरांच्या वाहनाची जप्ती टळली
By admin | Published: February 18, 2016 12:07 AM2016-02-18T00:07:43+5:302016-02-18T00:07:43+5:30
संपादित जमिनीचा मोबदला देण्यास विलंब केल्याप्रकरणी जिल्हाधिका:यांचे वाहन जप्त करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. वाहन जप्ती टाळण्यासाठी बुधवारी प्रशासनस्तरावर कार्यवाही झाल्याने नामुष्की टळली.
नंदुरबार : सिंचन प्रकल्पासाठी संपादित जमिनीचा वाढीव मोबदला देण्यास विलंब केल्याप्रकरणी जिल्हाधिका:यांचे वाहन जप्त करण्याचे आदेश दिवाणी न्यायालयाने दिले. परंतु वाहन जप्ती टाळण्यासाठी बुधवारी प्रशासनस्तरावर लागलीच कार्यवाही झाल्याने नामुष्की टळली. झराळी लघुतलावासाठी संपादित केलेल्या जमिनीचा 21 लाख 21 हजार 313 रुपयांचा वाढीव मोबदला देण्यास प्रशासनातर्फे टाळाटाळ केली जात होती. जमीन मालक सुरेंद्रसिंग रघुवंशी यांनी दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला होता. न्या. आर.जे.तांबे यांनी जिल्हाधिका:यांचे वाहन जप्त करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार बुधवार, 17 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता वाहन जप्त करण्यात येणार होते. मात्र, जिल्हाधिकारी कार्यालय आणि पाटबंधारे व जलसंपादा विभाग कार्यालयातील अधिका:यांनी तातडीने सायंकाळी संपूर्ण 21 लाख 21 हजार 313 रुपयांचा धनादेश न्यायालयात सादर केला. त्यामुळे जिल्हाधिका:यांच्या वाहनाची जप्ती टळली.