संकटावर मात करी स्वाध्याय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2019 01:12 AM2019-05-12T01:12:02+5:302019-05-12T01:12:16+5:30
जळगाव येथील शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.देवानंदा सांखला लिहिताहेत ‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत...
स्वाध्याय गुरू की वाणी है, स्वाध्याय आत्मकहानी है. स्वाध्यायसे प्रमाद दूर करो, स्वाध्याय करो
स्वाध्याय प्रभू के चरणोंमे पहुचने का साधन मानो, स्वाध्याय है मित्र, स्वाध्याय है गुरू स्वाध्याय करो,
टी.व्ही., मोबाइल, संगणक मे जीवन धन बर्बाद मत करो, सत्संग करो, सद्ग्रंथ पढो, स्वाध्याय करो.
स्वाध्याय आत्म्याचा अत्यंत निकटचा हितैषी मित्र आहे. भारतातील प्रत्येक दर्शनमध्ये स्वाध्याय या क्रियेला महत्वाचे, मानाचे स्थान दिले आहे. या विश्वात अनेक आत्मा भटकत आहे. त्यांच्यावर धर्मगुरूंनी, प्रभुंनी अनंताअनंत करुणा, कृपा केली आणि स्वाध्याय करण्याचा सल्ला दिला.
जन्म-मृत्यूच्या भटकणाऱ्या फेºयातून मुक्त होण्यासाठी, सद्गती मिळवण्यासाठी, धर्मग्रंथाचे वाचन-चिंतन-मनन-स्मरण, आचरण करण्याचा, अर्थात दुसºया शब्दात स्वाध्याय करण्याचा मौलिक संदेश दिला. स्वाध्याय हा प्रत्येक मानवाचा धर्म आहे. त्याचा कर्तव्य आहे. शरीराची भूक आहाराने तृप्त होते. तद्वतच मनाची तृप्ती स्वाध्याय साधनेने होते. भारतातील सर्व दर्शन तप-त्याग प्रधान आहे. सम्यक ज्ञान, सम्यक दर्शन, सम्यक चरित्र आणि सम्यक तप या सर्वांच्या सम्यक आचरणाने साधक आपल्या सिद्धीपर्यंत पोहोचू शकतो. स्वाध्याय साधनेचा सर्वश्रेष्ठ मार्ग आहे. स्वाध्याय ही एक महान सद्प्रवृत्ती आहे. जी बर्हिआत्म्याला मिध्यात्वपासून समकित, समकितपासून देशविरती, देशविरतीपासून सर्व विरती आणि सर्वविरतीपासून वितरागत्वाकडे नेते. जे साधक शिथिलाचारी आहेत, त्यांना दृढधर्मी, प्रियधर्मी बनवून शेवटी सर्व कर्मातून मुक्त करून परमात्मा बनण्याची प्रेरणा व बळ देते. स्वाध्याय केल्याने सन्मान मिळतो, सौभाग्य प्राप्ती होते. बुद्धीमध्ये वृद्धी होते. साधुता येते. या सर्वामुळे अलौकिक शांती मिळते. स्वाध्याय सर्व दु:खावरील रामबाण उपाय आहे. मानवी मन हे प्रचंड चंचल आहे. अशा ह्या अस्थिर मनाला स्थैर्य देण्यासाठी, नियंत्रणात ठेवण्यासाठी स्वाध्याय उपयोगी शस्त्र आहे. स्वाध्यायी साधक सर्वत्र पूजला जातो.
स्वाध्याय अर्थात ‘स्व’चा स्वत:च्या आत्म्याचे ज्ञान होणे, ‘स्व’ आणि स्वत:चे अध्ययन करणे, ‘स्वस्थ आत्म्न: अध्ययन् स्वाध्याय:’ अर्थात स्वत:च्या आत्म्याचा अभ्यास म्हणजे स्वाध्याय आणि अशा हा अभ्यास करण्याचे अनेक मार्ग सांगितले आहे. गुरूभगवंत, श्रेष्ठ -ज्ञानी, महापुरूष यांच्या सानिध्यात जाणे, नवनवीन ज्ञानप्राप्ती करणे, आत्मसात करणे, त्याची उजळणी करणे, त्यावर चिंतन करणे, त्याचा प्रसार करणे इत्यादी क्रियांचा त्यात समावेश होतो. इतिहासात म्हटले आहे, ‘स्वाध्याये शान्ति दक्तमा’ अर्थात स्वाध्याय केल्याने संचित कर्म सहज क्षय होतात.
अनादिकालापासून अज्ञान व मोह यामध्ये अडकलेल्या, बेभान झालेल्या, आत्म्याला जागृत करून त्याला त्याच्या मूळ जागेवर पुन: प्रस्थापित करण्यासाठी स्वाध्याय अनन्यसाधारण अस्त्र आहे. अज्ञानरूपी अंधारात विषय कषाय रुपी तुफानमध्ये फसलेल्या व्यक्तीसाठी स्वाध्याय ही टॉर्च आहे. ही टॉर्च सोबत असेल तर तो सहजरित्या संसारातील संकटावर मात करून उद्देशापर्यंत पोहोचू शकेल. ज्याने टॉर्चला ओझे मानून फेकून दिले त्याच्या नशिबात अज्ञान, भ्रमण हाच पर्याय शिल्लक आहे.
स्वाध्यायशिवाय केलेले जप, तप, पूजा, पाठ सर्व निरर्थक आहे. स्वाध्यायची विशेषत: व महत्ता जाणून प्राचीन काळी जेव्हा विद्यार्थी गुरूकुलातील अध्ययन संपवून निरोप घेत तेव्हा गुरू त्यांना आशीर्वाद देताना सांगत, ‘स्वाध्यायन्मा प्रमद’ अर्थात स्व-अध्याय कर. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात ज्योती व दीप्ती प्राप्त करणाºया स्वाध्यायाचे महत्व जाणून स्वाध्याय क्रिया जीवनात उतरावी, हीच हार्दिक कामना-अभिलाषा आहे.
-प्राचार्या डॉ.देवानंदा सांखला, जळगाव