जीएसटी व कर्जमाफीबाबत संभ्रम कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2017 09:03 PM2017-10-08T21:03:49+5:302017-10-08T21:05:46+5:30
एकनाथराव खडसेंनी दिला सरकारला घरचा आहेर
आॅनलाईन लोकमत जळगाव, दि.८- आज समाजाच्या सर्वच घटकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. तरूणांमध्ये करीअर, नोकरीबाबत तर नेत्यांमध्ये जिल्हा नियोजन मंडळाच्या तसेच विकास कामांच्या निधीबाबत तर जनतेत ‘जीएसटी’ कमी होणार की जास्त? कर्जमाफी कधी मिळणार? नवºयाला मिळणार की बायकोला? याबाबत संभ्रम आहे. अगदी व्यासपीठावर बसलेले सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील देखील त्याबाबत सांगू शकणार नाहीत’ या शब्दात भाजपा नेते व माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी सरकारला घरचा आहेर दिला. अर्जुन भारूळे लिखित ‘तर्क तरूणाचा’ या पुस्तकाचे प्रकाशन रविवार, ८ रोजी सायंकाळी कांताई सभागृहात पार पडले. त्यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. तर शिवसेनेच्या नेत्यांनीही डीपीडीसीच्या निधीवरून पालकमंत्र्यांबाबत नाराजी व्यक्त केली. यावेळी व्यासपीठावर सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, माजीमंत्री सुरेशदादा जैन, शिवसेनेचे आमदार किशोर पाटील, राष्टÑवादीचे अल्पसंख्याक सेलचे प्रदेशाध्यक्ष हाजी गफ्फार मलिक, महापौर ललित कोल्हे, काँग्रेसचे शहर कार्याध्यक्ष डॉ.राधेश्याम चौधरी, नगरसेवक अमर जैन, सुनील माळी, जितेंद्र मुंदडा, माजी नगरसेवक अशोक लाडवंजारी, फारूख शेख उपस्थित होते. नेत्यांची टोलेबाजी अन् शेरोशायरी या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाला सेना,भाजप, मनसे, काँग्रेस व राष्टÑवादी अशा प्रमुख राजकीय पक्षांचे नेते व नगरसेवक मंडळी व्यासपीठावर उपस्थित असल्याने प्रकाशन कार्यक्रम असतानाही राजकीय मैफल रंगली. नेतेमंडळींनी भाषणातून टोलेबाजीही केली. तर गफ्फार मलिक व गुलाबराव पाटील यांची शेरोशायरीही उपस्थितांची दाद मिळवून गेली. तसेच सर्वच वक्त्यांनी पुस्तकाचे तरूण लेखक अर्जुन भारूळे यांचे कौतुक करीत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. दादा-खडसे जोडीअभावी खान्देशचा विकास खुंटला शिवसेनेचे आमदार किशोर पाटील म्हणाले, बºयाच वर्षांनी सुरेशदादा व खडसे एकत्र व्यासपीठावर उपस्थित असताना बोलण्याचा आज योग आला आहे. सुरेशदादा-खडसे ही जोडीच जिल्ह्याला व खान्देशला विकासाची दिशा देणारी जोडी होती. लाखो, कोटींच्या योजना त्यांनी आणल्या. जळगाव जिल्हा तर या जोडीनेच ओळखला जायचा. मात्र आज दोन्ही पदांवर नाहीत. हे जिल्ह्याचे व खान्देशचे दुर्देव. त्यामुळे जळगाव जिल्ह्याचाच नव्हे खान्देशचा विकास गेल्या चार-पाच वर्षात खुंटला असल्याचे सांगितले. दीड वर्षांपासून डीपीडीसीचा १ रूपयाही नाही आमदार किशोर पाटील म्हणाले की, खडसे पालकमंत्रीपदावरून उतरल्यानंतर गेल्या दीड वर्षात डीपीडीसीचा १ रूपयाचा निधी देखील आमदारांना मिळालेला नाही. जिल्ह्यातील पालकमंत्री असतेतर असे झाले नसते. सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यांच्या भाषणात आमदार पाटील यांनी उपस्थित केलेला डीपीडीसीच्या निधीचा मुद्दा उचलून धरला. ते म्हणाले की, डीपीडीसीचा एक रूपयाचा निधीही दीड वर्षांपासून मिळालेला नाही. त्यामुळे यापूर्वी जसे बैठक घेऊन या निधीचे वाटप केले होते, तसेच वाटप करावे लागेल. शिवसैनिक गोंधळ घालतात...आम्हाला तेही करता येत नाही खडसे म्हणाले की, दीड वर्षात निधी न मिळाल्याने जिल्'ातील विकासाची लहान-मोठी कामे मार्गी लागली नाही. सुरेशदादांना उद्देशून म्हणाले ‘दादा १ रूपयाभी नही मिला. पता नही क्यू नही मिला?’ गुलाबरावांचे शिवसैनिक जिल्हा रूग्णालयात जाऊन गोंधळ घालतात. त्यांना ते जमते. आम्हाला तेही करता येत नाही. ‘दादा जिल्'ात ७० टक्के डॉक्टरांची पदे रिक्त आहेत.’ जीएसटी, कर्जमाफीबाबत सत्ताधारीही संभ्रमात आमदार खडसे म्हणाले जीवनाची दिशा काय असावी? हे निश्चत नसते, तोपर्यंत संभ्रमावस्था असते. आज तरूणाई शिक्षण, नोकरी आदीबाबत संभ्रमात आहे. समाजातील प्रत्येकच घटक संभ्रमात आहे. आम्ही जीएसटीबाबत संभ्रमात आहोत. जीएसटी कमी होईल की वाढेल? कशाचा जीएसटी कमी होईल? याबाबत संभ्रम आहे. कर्जमाफीबाबत सत्ताधारी देखील संभ्रमात आहेत. कर्जमाफी नवºयाला मिळेल? की बायकोला? की दोघांना?, कधी मिळेल? दसºयानंतर मिळेल की दिवाळीनंतर ? याबाबत संभ्रम आहे. गुलाबरावांनाही कर्जमाफीबाबत माहिती नाही.... खडसे म्हणाले,इथे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील बसले आहेत. त्यांनाही माहिती नाही. माहित असेल तर त्यांनी सांगावे. प्रत्येक बाबतीत संभ्रमावस्था होत असेल तर आत्मविश्वास मजबूत होत नाही. त्यामुळे कामाला योग्य दिशा मिळत नाही, असेही खडसे यांनी सांगितले. युवकांमध्ये आत्महत्यांचे प्रमाण वाढत असल्याची चिंता व्यक्त करीत युवक पूर्वी घरात आजी-आजोबा, वडिल अथवा मित्राजवळ मन मोकळे करायचे. मात्र आता मनातील घुसमट मनातच ठेवतात. मन मोकळे केले पाहिजे, असे सांगितले. लेखणीत ताकद लागते खडसे म्हणाले की, मलाही अनेकदा अनुभव लिहून काढा, असा आग्रह होतो. मात्र त्यासाठी एकाग्रता लागते. लेखणीत ताकद लागते, असे सांगितले. वस्तुस्थिती मांडण्याचा प्रयत्न-सुरेशदादा सुरेशदादा म्हणाले की, लेखक अर्जुन भारूळे याने या पुस्तकात वस्तुस्थिती मांडण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच त्यावर त्याच्या पद्धतीने उपायही सुचविला आहे, असे सांगून त्यास भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच त्याच्या पुस्तकांच्या १०१ प्रती शाळेसाठी घेण्याचे जाहीर केले. आभार डी.सी. कोळी यांनी मानले.