जिल्हा बँकेत गोंधळ

By admin | Published: April 28, 2017 12:58 AM2017-04-28T00:58:43+5:302017-04-28T00:58:43+5:30

जामनेर : कर्जाची रक्कम न मिळाल्याने शेतकरी संतप्त

Confusion in District Bank | जिल्हा बँकेत गोंधळ

जिल्हा बँकेत गोंधळ

Next

जामनेर : शेतक:यांना मिळणारी पीक कर्जाची रक्कम जिल्हा बँकेच्या शाखेतून मिळत नसल्याने गुरुवारी संतप्त शेतक:यांनी अधिका:यांना जाब विचारला. सुमारे दोन तास हा गोंधळ सुरू होता.
वि.का. सोसायटीकडून घेतलेल्या कर्जाची पूर्ण फेड करणा:या शेतक:यांना येणा:या खरीप हंगामासाठी जिल्हा बँकेकडून नवीन कर्जाचे वाटप केले जात आहे. दिल्या जाणा:या कर्जाची रक्कम शेतक:यांच्या बचत खात्यात जमा होऊन संबंधित खातेदार शेतकरी ही रक्कम आवश्यकतेनुसार खात्यातून काढत असे. दरम्यान, 25 एप्रिलला नाबार्डने जिल्हा बँकांना दिलेल्या आदेशानुसार शेतक:यांना बँकेकडून दिली जाणारी कर्जाची रक्कम त्यांच्या बचत खात्यात जमा न करता, ती त्यांना दिल्या जाणा:या किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून दिली जाणार आहे.
या आदेशानुसार जिल्हा बँकेच्या येथील शाखेत कार्यवाही होत असल्याने शेतकरी संतप्त झाले. मुळात तालुक्यात मोजक्याच खातेदारांना किसान क्रेडिट कार्डाचे वाटप करण्यात आले. आज रक्कम काढण्यासाठी आलेल्या एकाही शेतक:याला किसान कार्ड मिळालेले नव्हते. त्यामुळे रोख रक्कमच मिळावी, असा आग्रह त्यांनी शाखा व्यवस्थापकांकडे धरला. शाखा व्यवस्थापक व शेतक:यांमध्ये यावरून बराच वेळ बाचाबाची सुरू होती.
ज्या शेतक:यांनी कजर्फेड केली ते नवीन मंजूर कर्जाची रक्कम घेण्यास जिल्हा बँकेच्या विविध शाखांमध्ये जाऊन रक्कम काढत आहेत. या निर्णयानुसार काही रक्कम फक्त किसान क्रेडिट कार्डाने काढावी लागत असल्याने शेतकरी संतप्त झाले.
पूर्वीच्या व्यवस्थेनुसार बचत खात्यात कर्जाची रक्कम जमा करून ती खातेदाराला काढता येत होती. मात्र नाबार्डच्या आदेशामुळे संभ्रमावस्था वाढली व शेतकरी संतप्त झाले. आधीच शाखेत कमी कर्मचारी असून, त्यांच्यावर कामाचा बोजा वाढलेला आहे.
-नरेंद्र बाविस्कर, व्यवस्थापक,
जिल्हा बँक शाखा, जामनेर
वि.का. सोसायटीचे मागील पूर्ण कर्ज फेडल्यानंतर नवीन कर्जाची रक्कम घेण्यासाठी जामनेर शाखेत सकाळी 10 वाजेपासून थांबूनही दुपारी दोनर्पयत काहीही निर्णय झाला नाही. जिल्हा बँकेने शेतक:यांचे हाल थांबवून खात्यातूनच रक्कम देण्याची व्यवस्था करावी.
-अभिमान नारायण गाभे,
शेतकरी, कोदोली, ता. जामनेर

Web Title: Confusion in District Bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.