कु:हाड खु येथील ग्रामसभेत गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2017 01:21 PM2017-08-16T13:21:59+5:302017-08-16T13:22:26+5:30

दोन गटाचे कार्यकर्ते एकमेकांवर आले धावून

Confusion in Gram Sabha | कु:हाड खु येथील ग्रामसभेत गोंधळ

कु:हाड खु येथील ग्रामसभेत गोंधळ

googlenewsNext
ठळक मुद्दे घरकुल योजनेत  धनाढय़ लोकांची नावे आल्याने आक्षेप  ख:या लाभार्थीना लाभ मिळावा

ऑनलाईन लोकमत

कु-हाड खुर्द, जि. जळगाव, दि. 16 - पाचोरा तालुक्यातील कु-हाड खुर्द येथे 15 ऑगस्ट रोजी सकाळी ग्रामपंचायतीचे  विस्तार अधिकारी आर. एस. धस यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायतीच्या प्रांगणात सभा सुरू झाली असताना ग्रामस्थांनी घरकुल योजनेत  धनाढय़ लोकांची नावे आल्याने आक्षेप घेतल्याने सभेत गदारोळ झाला.  या लोकांची नावे कमी करून   ख:या लाभार्थीना लाभ मिळावा अशी मागणी करण्यात आली. दारुबंदी विषयावर  1 मे रोजीच्या सभेत ठराव झाल्यानंतरही त्याची अंमलबजावणी का होत नाही म्हणून गोंधळ सुरु होत दारुविक्रीस आश्रय देणा:या लोकांमध्ये  व ग्रामस्थांमध्ये शाब्दीक चकमक होत एकमेकांच्या अंगावर धावून आलेत. 

Web Title: Confusion in Gram Sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.