याद्यांच्या घोळामुळे कर्जमाफी पुन्हा लांबणीवर: तिसºयांदा केला प्रक्रियेत बदल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2017 10:59 PM2017-11-13T22:59:17+5:302017-11-13T23:00:28+5:30
जिल्हा बँकांना खात्यांची माहिती पुन्हा अपलोड करण्याचे आदेश
जळगाव: शासनाने आधी दिवाळीपूर्वी कर्जमाफी देण्याचे आश्वासन खोटे ठरल्यानंतर पालकमंत्र्यांनी ९ नोव्हेंबर रोजी जिल्'ातल १५ हजार पात्र शेतकºयांची यादी जाहीर झाली असून ३०६ कोटी बँकांकडे जमा केले असल्याची दिलेली माहितीही खोटी ठरली आहे. त्यात आता शासनाने बँकांकडून शेतकºयांच्या १ ते ६६ खात्यांच्या माहितीच्या अपलोड केलेल्या सर्व ८७७ विविध कार्यकारी सोसायट्यांची माहिती असलेल्या सीडी रद्द करीत सुधारीत पद्धतीने ही माहिती पुन्हा अपलोड करण्याचे तोंडी आदेश मुंबईत यासंदर्भात सोमवार दि.१३ रोजी झालेल्या बैठकीत दिले आहेत. त्यामुळे आता तिसºयांदा ही माहिती अपलोड करण्याची वेळ जिल्हा बँकांवर आली असून कर्जमाफीस आणखी १५ दिवस ते महिनाभराचा विलंब होणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना अर्थात कर्जमाफी योजनेत जिल्'ातील २ लाख ९० हजार ५०१ शेतकºयांनी आपले अर्ज दाखल केले आहेत. या शेतकºयांच्या १ ते ६६ कर्जखात्यांची सहकार विभागाच्या लेखापरिक्षण विभागातर्फे तपासणी करून ही माहिती जिल्हा बँकेमार्फत अपलोड करण्यात आली. त्याची छाननी शासनस्तरावर विशेष सॉफ्टवेअरद्वारे करण्यात येऊन त्यानुसार पात्र शेतकºयांची यादी जाहीर केली जाणार आहे. मात्र पहिल्यांदा माहिती अपलोड केल्यावर शासनाने टीका टाळण्यासाठी घाईगर्दीत दिवाळीपूर्वी कर्जमाफी देत असल्याचे दर्शविण्यासाठी १८ आॅक्टोबरपासून प्रारंभ होत असल्याचे जाहीर केले. त्यात ३२ शेतकºयांना प्रातिनिधीक स्वरूपात कर्जमुक्तीचे प्रमाणपत्रही देण्यात आले. मात्र अद्यापही या शेतकºयांची कर्जमुक्ती झालेली नाही. दरम्यान याचवेळी उर्वरीत पात्र शेतकºयांच्या याद्या शासनाकडून लगेचच जाहीर करून कर्जमाफी दिली जाईल, असे सांगण्यात आले. मात्र १ ते ६६ खात्यांच्या अपलोड केलेल्या माहितीबाबत अडचण आल्याने जिल्हा बँकेला ही माहिती सुधारीत करून अपलोड करण्याची सूचना करण्यात आली. त्यानुसार हे काम गुरूवार, दि.९ नोव्हेंबरपर्यंत सुरूच होते. असे असताना पालकमंत्र्यांनी मात्र १५ हजार पात्र शेतकºयांची यादी जाहीर झाली असून ३०६ कोटी बँकेकडे जमा केले असल्याचे परस्पर जाहीर करून टाकले. प्रत्यक्षात त्यावेळी केवळ ११७९ शेतकºयांचीच यादी जिल्हा बँकेला प्राप्त झालेली होती. त्यासाठी ६ कोटी ७७ लाख ८१ हजार २९६ रूपयांची कर्जमाफी देण्याचे नमूद होते. ती यादी देखील शुक्रवार दि.१० रोजी बदलून नवीन यादी घेण्याची अजब सूचना शासनाने केली. आधीची यादी रद्द करून सुधारीत ११५४ लोकांचीच सुधारीत यादी पाठविण्यात आली. त्यांची केवळ ६ कोटी ६१ लाख ४६ हजार ४६० रूपयांची कर्जरक्कम खात्यावर वळती करण्याचे सूचित करण्यात आले. तसेच शासनाने बँकेकडे पात्र शेतकºयांची नावे व पैसे जमा करणे सुरू केले असले तरीही विकासो निहाय यादीच दिलेली नसल्याने अडचण निर्माण झाली.
पुन्हा नियमात बदल
हे घोळ सुरू असताना सोमवार दि.१३ रोजी पुन्हा मुंबई येथील बैठकीत शेतकºयांच्या कर्ज खात्यांच्या १ ते ६६ खात्याची माहिती पुन्हा सुधारीत पद्धतीने अपलोड करण्याचे तोंडी आदेश देण्यात आले.
घोळ मिटण्याची चिन्ह दिसेना
कर्जमाफी योजनेत आयटी विभागाच्या चुकांमुळे अधिक घोळ निर्माण होत असून सातत्याने माहिती भरण्यात बदल सुचविले जात आहे. त्यामुळे आता तिसºयांदा माहिती भरण्यात पुन्हा पंधरा दिवस ते महिनाभराचा कालावधी जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा घोळ मिटण्याची चिन्ह नसून कर्जमाफी कधी मिळणार? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.