अधिकाऱ्यांसमोर शिक्षकांच्या आंदोलनात गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2020 12:13 PM2020-03-11T12:13:52+5:302020-03-11T12:14:24+5:30
सील तोडून पुरावे नष्ट केल्याचा संघटनेचा आरोप
जळगाव : जामनेर येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या प्रभारी मुख्याध्यापकांच्या मान्यता रद्द करण्याच्या मागणीसाठी आयोजित बहुजन शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी संसद या संघटनेच्या आंदोलनात सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास गोंधळ उडाला होता़ अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ चर्चा करीत असतांना अचानक कोणीतरी आक्षेप घेतल्यामुळे आंदोलनकर्ते संतापले होते़ दरम्यान, संघटनेच्या पदाधिकाºयांनी मुख्य कार्यकारी अधिकाºयांची भेट घेतली मात्र, समाधान होत नसल्याने पुन्हा साखळी उपोषणाचा इशारा देण्यात आला आह़े.
प्रभारी मुख्याध्यापक बी़ आऱ चौधरी यांच्यावर शालेय रद्दी विक्री प्रकरणात गुन्हा दाखल आहे़ अशा स्थितीत त्यांचे कार्यालय सील करण्यात आले होते़ त्यांच्याकडे पदभार देऊ नये, असे आदेश असतानाही शिक्षणाधिकारी बी़ जे़ पाटील यांनी चौधरी यांना पदभार दिला, ही बेकायदेशीर मान्यता रद्द करावी, अशी मागणी बहुजन शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी संसद संघटनेतर्फे करण्यात आली़ यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शुद्धोधन सोनवणे, जिल्हा सरचिटणीस अनिल सोनवणे, संघटक सिद्धार्थ तायडे, माध्यमिक शिक्षक पतपेढीचे एस. डी. भिरूड, एस़ जी़ इंगळे, यु़ यु. पाटील उपस्थित होते़
सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास शिक्षणाधिकारी पाटील व उपमुख्य कार्यकारी अधिकारी के़ बी़ रणदिवे हे आंदोलनकर्त्यांची भेट घ्यायला गेले़ त्यांच्याशी चर्चा सुरू असताना प्रभारी मुख्याध्यापकांना कुणीतरी चोर म्हटल्यानंतर या शब्दाला बाहेरून आलेल्या एका पदाधिकाºयांनी यावर आक्षेप घेताच आंदोलनकर्ते आक्रमक झाले. अधिकाºयांना त्यांनी जाब विचारला़ दहा ते पंधरा मिनिटाच्या या गोंधळाने तणाव निर्माण झाला होत़ अखेर अधिकाºयांनी संबधित व्यक्तिला समजावले व हा वाद मिटला.
जिल्हा परिषद : चोरीच्या उल्लेखाला आक्षेप घेतल्याने संताप, अधिकाºयांना विचारला जाब
सील तोडून पुरावे नष्ट केल्याचा संघटनेचा आरोप
शालेय रद्दी विक्री प्रकरणात ज्या कार्यालयात पुरावे होते व ज्या कार्यालयाला सील लावण्यात आले होते़ ते सील कुणाचीही परवानगी न घेता रविवारी बी़ आऱ चौधरी यांनी तोडून या प्रकणाचे सर्व पुरावे नष्ट केल्याचा आरोप संघटनेने केला आहे़ त्यामुळे हे प्रकरण आणखीन वाढण्याची शक्यता आहे.