लसीकरण केंद्रावर गोंधळ २ तास लसीकरण थांबले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:20 AM2021-08-22T04:20:44+5:302021-08-22T04:20:44+5:30
दि. २१ रोजी पहिल्या डोससाठी ७० तर दुसऱ्यांसाठी २३० डोस लसीचे पाठविण्यात आले होते. पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या रांगेत ...
दि. २१ रोजी पहिल्या डोससाठी ७० तर दुसऱ्यांसाठी २३० डोस लसीचे पाठविण्यात आले होते. पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या रांगेत जास्त होती. मग ७० लसीकरण झाल्यानंतर पहिला डोस संपल्याचे जाहीर केले. मग सकाळपासून रांगेत उभे असणाऱ्यांनी लसीकरण खोलीत जाऊन आम्हाला लस द्या, त्याशिवाय आम्ही येथून जाणार नाही, अशी भूमिका अनेकांनी घेतली. त्यामुळे एकच गोंधळ वाढला. मग लसीकरण करणाऱ्या परिचारिका राखी बडगुजर यांनी लोकांना समजाविले व वरिष्ठांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर मग वरिष्ठांनी लसीकरणाच्या पहिल्या डोसची संख्या वाढवून दिली. मग पुन्हा लसीकरण सुरळीतपणे सुरू झाले. रात्री ८ वाजेपर्यंत लसीकरण परिचारिका राखी बडगुजर यांनी या केंद्रावर केले.
शहरासह तालुक्यात लसीचा पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यादृष्टीने पहिला व दुसऱ्या डोसच्या लसीकरणासाठी तेवढ्याप्रमाणात डोस उपलब्ध करून देण्यात यावे, तसे नियोजन झाले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.