जि.प.जलशक्तीच्या कामांच्या निविदांमध्ये घोळ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:21 AM2021-08-27T04:21:23+5:302021-08-27T04:21:23+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्हा परिषदेकडून राबविण्यात आलेल्या जलशक्ती अभियानाच्या कामांच्या निविदांबाबत माहिती अधिकारात माहिती मागवूनही शिवाय चलन ...

Confusion in ZP water works tenders? | जि.प.जलशक्तीच्या कामांच्या निविदांमध्ये घोळ?

जि.प.जलशक्तीच्या कामांच्या निविदांमध्ये घोळ?

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जिल्हा परिषदेकडून राबविण्यात आलेल्या जलशक्ती अभियानाच्या कामांच्या निविदांबाबत माहिती अधिकारात माहिती मागवूनही शिवाय चलन भरूनही माहिती दिली जात नसल्याने या निविदा प्रक्रियेत घोळ झाल्याचा आरोप काँग्रेस पदाधिकारी संजय वराडे यांनी केला आहे. त्यांनी जून महिन्यात या माहिती अधिकाराचे चलन भरले आहे.

भाजपकडून राबविण्यात आलेल्या या अभियानाचे जिल्ह्यातील रावेर व यावल तालुक्यता ७.५ कोटींची कामे घेण्यात आली आहे. या निविदा राबविताना नियमांचा भंग झाला असल्याचे वराडे यांचे म्हणणे आहे. यासाठी आपण माहिती अधिकारात याबाबत माहिती मागितली होती. जून महिन्यात आपल्याला याचे चलनही भरायला लावले होते. आपण ५ हजार ९५२ रुपयांचे चलनही भरले, यात आपल्याला दोन महिने उलटूनही आपल्या माहिती का दिली जात नाही, असा प्रश्न वराडे यांनी उपस्थित केला आहे.

जलशक्ती अभियानाची निविदा प्रक्रिया नियमानुसार व शासन आदेशानुसारच राबविली गेली आहे. जर सरकारचा आर्थिक फायदा होत असेल तर ठेकेदाराला संधी देतो. त्यानंतर कागदपत्रे नसतील तर जो एल २ किंवा एल ३ असतो त्याला आपण एल १ च्या रेटनुसारच काम करावे लागेल हे सांगतो. या अभियानाची कामे संपूर्ण सहा महिने झालेली आहे. मी तत्कालीन अधिकारी होतो. त्यामुळे माहिती अधिकाराच्या अर्जाबाबत मला माहिती नाही. मात्र, चलन भरले असेल तर त्यांना माहिती द्यावी लागेल. - एस. एल. पाटील, तत्कालीन कार्यकारी अभियंता

Web Title: Confusion in ZP water works tenders?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.