कर्जमाफीच्या मागणीसाठी मुक्ताईनगरात काँग्रेसचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2017 05:47 PM2017-10-10T17:47:48+5:302017-10-10T17:54:28+5:30

दिवाळीपूर्वी शेतकºयांची सरसकट कर्जमाफी करण्यात यावी. तालुक्यातील संपूर्ण भारनियमन बंद करण्यात यावे. सरकारमान्य स्वस्त धान्य दुकानांमध्ये दिवाळीपूर्वी साखर,गहू,तांदूळ,तेल या सारखे आवश्यक धान्य उपलब्ध करुन द्यावे. या मागण्यांसाठी मुक्ताईनगर तालुका काँग्रेस कमिटीतर्फे तहसीलदार यांच्या दालनासमोर घोषणा देऊन राज्य व केंद्र शासनाच्या धोरणांचा निषेध करण्यात आला.

Congress agitation in Muktainagar for demand of loan waiver | कर्जमाफीच्या मागणीसाठी मुक्ताईनगरात काँग्रेसचे आंदोलन

कर्जमाफीच्या मागणीसाठी मुक्ताईनगरात काँग्रेसचे आंदोलन

Next
ठळक मुद्देतहसीलदार यांच्या दालना समोरच घोषणाबाजी...सरकारमान्य स्वस्त धान्य दुकानांमध्ये दिवाळीपूर्वी साखर,गहू,तांदूळ,तेल या सारखे आवश्यक धान्य उपलब्ध करुन द्यातालुक्यातील संपूर्ण भारनियमन बंद करण्यात यावे

आॅनलाईन लोकमत
मुक्ताईनगर,दि.१० - दिवाळीपूर्वी शेतकºयांची सरसकट कर्जमाफी करण्यात यावी. तालुक्यातील संपूर्ण भारनियमन बंद करण्यात यावे. सरकारमान्य स्वस्त धान्य दुकानांमध्ये दिवाळीपूर्वी साखर,गहू,तांदूळ,तेल या सारखे आवश्यक धान्य उपलब्ध करुन द्यावे. या मागण्यांसाठी मुक्ताईनगर तालुका काँग्रेस कमिटीतर्फे तहसीलदार यांच्या दालनासमोर घोषणा देऊन राज्य व केंद्र शासनाच्या धोरणांचा निषेध करण्यात आला.
काँग्रेसने मुद्रांक विक्रेत्यांच्या बेमुदत उपोषणाला देखील स्वतंत्र निवेदनांदवारे पाठिंबा दिला. आंदोलनाचे नेतृत्व जिल्हा सरचिटणीस डॉ.जगदीश पाटील, जिल्हा उपाध्यक्ष प्रभाकर पाटील, तालुका अध्यक्ष आत्माराम जाधव, लक्ष्मणसिंग राजपूत यांनी केले. नायब तहसीलदार शांताराम चौधरी यांनी निवेदन स्वीकारले.
यावेळी अ‍ॅड.अरविंद गोसावी, प्रभाकर चौधरी, रवींद्र दिगंबर महाजन, बाळासाहेब पाटील, नामदेव मिठाराम भोई, बी.डी.गवई, कासम ठेकेदार, बाळू कांडेलकर, सुनील भंगाळे, संजय पाटील, डॉ. विष्णू रोटे, प्रकाश पाटील, पूना इंगळे, शकील आझाद, रवींद्र दांडगे, गणेश सोनवणे, शांताराम कंडेलकर, सदाशिव लष्करे, अतुल जावरे, संभाजी पारधी, नीलेश पाटील, किसन चव्हाण, आलमशहा अहमदशहा, गोपाळ सिंग राजपूत, नामदेव चोपडे, रवींद्र गरुड, विनोद गरुड, भाऊलाल पाटील, साहेबराव पाटील, वैभव पाटील,समाधान भोलाने, संतोष पाटील या प्रमुख पदाधिकाºयांसह मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
तहसीलदार यांच्या दालना समोरच घोषणाबाजी...
काँग्रेस कार्यकर्त्यांनी तहसीलदार यांच्या दालनासमोरच बसून केंद्र व राज्य शासनाविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली. प्रसंगी काँग्रेसच्या या वेगळ्याच आंदोलनामुळे तहसीलदार कार्यालय आवार परिसर दुमदुमून गेला.

Web Title: Congress agitation in Muktainagar for demand of loan waiver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.