काँग्रेस देशाच्या संविधानासाठी कटिबद्ध : नाना पटोले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:12 AM2021-06-25T04:12:49+5:302021-06-25T04:12:49+5:30
बुधवारी सायंकाळी ७ वाजता आयोजित सभा रात्री साडेअकराच्या सुमारास सुरू झाली आणि गुरुवारी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास आटोपली. स्थानिक ...
बुधवारी सायंकाळी ७ वाजता आयोजित सभा रात्री साडेअकराच्या सुमारास सुरू झाली आणि गुरुवारी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास आटोपली. स्थानिक समस्येवर बोलताना नाना पटोले यांनी निम्न तापी प्रकल्पात जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांना मोबदला देण्याचे काम होईल. शेतकऱ्यांचे प्रलंबित प्रश्नांना काही दिवसात न्याय देण्याचा प्रयत्न राहील, असे सांगितले.
व्यासपीठावर काँग्रेसचे कार्याध्यक्ष तथा आमदार कुणाल पाटील, माजी मंत्री शोभा बच्छाव, अतुल लोंढे, माजी खासदार उल्हास पाटील, आमदार प्रणिती शिंदे, आमदार शिरीष चौधरी, जिल्हाध्यक्ष संदीप पाटील, महिला जिल्हाध्यक्ष सुलोचना वाघ,डी. जी. पाटील, तालुकाध्यक्ष गोकूळ बोरसे, माजी आमदार साहेबराव पाटील, प्रदीप पवार, डॉ. अनिल शिंदे, सचिन सोमवंशी हजर होते.
यावेळी अमळनेर तालुक्यासाठी ५ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरचे लोकार्पण करण्यात आले. प्रास्तविक मनोज पाटील यांनी केले. सभेस जिल्हा किसान सेलचे अध्यक्ष सुरेश पिरन पाटील, तालुकाध्यक्ष सुभाष पाटील, मुन्ना शर्मा, युवक अध्यक्ष महेश पाटील, अलीम मुजावर हजर होते.