महागाईविरोधात यावलला काँग्रेसची सायकल रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:11 AM2021-07-12T04:11:21+5:302021-07-12T04:11:21+5:30
नरेंद्र मोदी यांनी सात वर्षांपूर्वी केंद्रात सत्ता मिळवण्यासाठी जनतेला दाखवलेले अच्छे दिनचे स्वप्न हे बुरे दिनमध्ये रूपांतरित झाले असल्याने ...
नरेंद्र मोदी यांनी सात वर्षांपूर्वी केंद्रात सत्ता मिळवण्यासाठी जनतेला दाखवलेले अच्छे दिनचे स्वप्न हे बुरे दिनमध्ये रूपांतरित झाले असल्याने नागरिकांना जीवन जगणे कठीण झाले असल्याचे दिसत आहे, असे मत काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी आंदोलनाला सुरुवात करण्यापूर्वी व्यक्त केले. रविवारी सकाळी अकरा वाजता येथील जीन प्रेसपासून सायकल रॅलीची सुरुवात झाली.
बुरूज चौक, जुना भाजीबाजार चौक, मुख्य रस्तामार्गे येथील पंचायत समितीजवळ रॅलीची सांगता करण्यात आली. रॅलीत नगरसेवक मनोहर सोनवणे, नगरसेवक असलम शेख नबी, नगरसेवक समीर शेख मोमीन, गुलाम रसूल हाजी गुलाम दस्तगीर, इंटकचे जिल्हा अध्यक्ष भगतसिंग पाटील, शहर उपाध्यक्ष अनिल जंजाळे, हाजी गफ्फार शाह, कोरपावली सरपंच विलास अडकमोल, दहिगाव सरपंच अजय अडकमोल, बामणोदचे सरपंच राहुल विलास तायडे, ग्रामीण कॉंग्रेस सेवा फाउंडेशनचे जिल्हाध्यक्ष जलील पटेल, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मुक्तार तडवी, नईम शेख, पुंडलिक बारी, अभय महाजन, कमिटी प्रदेशचे उमेश जावळे, वढोदे सरपंच संदीप सोनवणे, युवक काँग्रेस इम्रान पहेलवान यांच्यासह आदी काँग्रेस कमिटीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता.
सायकल रॅलीचा प्रारंभ करताना शिरीष चौधरी, रमेश चौधरी, प्रभाकर सोनवणे आदी. (डी. बी. पाटील)