मुक्ताईनगर तहसीलवर काँग्रेसची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2019 07:20 PM2019-11-08T19:20:36+5:302019-11-08T19:22:40+5:30

अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये मोबदला विनाविलंब देऊन त्वरित शेतकऱ्यांची कर्जमाफी वीज बिल शेतसारा माफ करून मिळावा यासाठी मुक्ताईनगर तालुका राष्ट्रीय काँग्रेसतर्फे धरणे आंदोलने करून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

Congress demonstrations on Muktinagar tahsil | मुक्ताईनगर तहसीलवर काँग्रेसची निदर्शने

मुक्ताईनगर तहसीलवर काँग्रेसची निदर्शने

Next
ठळक मुद्देमोबदला व शेतसारा माफ करण्याची मागणीनुकसान भरपाई तत्काळ मिळावी धरणे आंदोलने करून तहसीलदारांना निवेदन

मुक्ताईनगर, जि.जळगाव : तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये मोबदला विनाविलंब देऊन त्वरित शेतकऱ्यांची कर्जमाफी वीज बिल शेतसारा माफ करून मिळावा यासाठी मुक्ताईनगर तालुका राष्ट्रीय काँग्रेसतर्फे धरणे आंदोलने करून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
मुक्ताईनगर तालुक्यात अवकाळी पावसामुळे कापणीला आलेली खरीप पिके उद्ध्वस्त झाली आहेत. पावसामुळे भिजलेले सोयाबीन, ज्वारी तसेच कापूस या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी वर्ग कर्जबाजारी झाला आहे शेतकºयांच्या तोंडाशी आलेला घास अवकाळी पावसामुळे दिवाळीच्या कालावधीत शेतकºयांवर संकट असताना बँकांचा सतत वसुलीचा तगादा व विमा कंपन्यांचा बेजबाबदारपणा यातच केंद्रातील व राज्यातील युती सरकारची उदासीनता या सर्व गोष्टींना कारणीभूत आहे. तसेच तीन वर्षांपूर्वी झालेली नोटबंदी व जीएसटी यासारख्या जास्त धोरण अवलंबले यामुळे देशाची अर्थव्यवस्था अस्ताव्यस्त झालेली आहे. या सर्व गोष्टींचा परिणाम सामान्य जनतेस सहन न होणारी महागाई व सुशिक्षित तरुण पिढीवर बेरोजगारीची व उपास मिरची वेळ आलेली आहे. शेतकºयांचा अधिक अंतर न पाहता झालेल्या पिकांच्या नुकसानीचे शेतकºयांना सरसकट फॅक्टरी ५० हजार रुपये मोबदला विनाविलंब देऊन त्वरित शेतकºयांची कर्जमाफी वीज बिल माफी शेतसारा माफ करावा, भाजप सरकारच्या उदासीनतेमुळे मुक्ताईनगर तालुका राष्ट्रीय काँग्रेसतर्फे शासनाचा निषेध करण्यात येत आहे.
अशा प्रकारचे निवेदन तालुका काँग्रेस कमिटीतर्फे तहसीलदारांंना देण्यात आले. यावेळी जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष एस.ए.भोई, जिल्हा सरचिटणीस डॉ.जगदीश पाटील, तालुकाध्यक्ष आत्माराम जाधव, सुरेश चौधरी, आसिफ खान, बी.डी.गवई, नीरज बोराखेडे, सादीक शेख, डॉ.विष्णू रोट, बाळासाहेब पाटील, सोनूसिंग पवार, नामदेव भोई, संजय धामोळे, विनोद महाजन, आनंदा कोळी, शकील आझाद, पिंटू पाटील, अमोल पाटील, प्रदीप पाटील, प्रमोद इंगळे, आकाश कोळी, भगवान चोपडे, मुख्तार रब्बानी, दीपक वाघ, संभाजी पारधी, रामराव पाटील, विनोद चौधरी, अरुण कांडोलकर, पुरुषोत्तम पाटील, अमोल जैन आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
 

Web Title: Congress demonstrations on Muktinagar tahsil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.