काँग्रेसने अखेर गर्दी जमवली मात्र, नको त्या वेळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:17 AM2021-05-21T04:17:22+5:302021-05-21T04:17:22+5:30
प्रत्येक पक्षाला वैयक्तिक पातळीवर पक्षसंघटना वाढविण्याचे स्वातंत्र आहे, असे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या जळगाव दौऱ्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया होती... ...
प्रत्येक पक्षाला वैयक्तिक पातळीवर पक्षसंघटना वाढविण्याचे स्वातंत्र आहे, असे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या जळगाव दौऱ्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया होती... राष्ट्रवादीच्या या परिवार संवाद यात्रेत उसळलेली प्रचंड गर्दी व त्यानंतर जिल्ह्यात कोरेानाने घेतलेली उसळी, शिवाय राष्ट्रवादीच्याच अनेक नेत्यांना झालेली कोरोनाची लागण या सर्व बाबी दुर्लक्ष करण्यासारख्या नाही. अधिक गर्दी जमली म्हणजे पक्षाची त्याभागात तेवढी ताकद अशी समजूत आहेच, काँग्रेसच्या बाबतीत यात काही वेगळे नाही, काँग्रेसची आधीची आंदोलने बघितली तर अगदी बोटावर मोजण्याइतके कार्यकर्ते असायचे तेव्हा काँग्रेसचे अस्तित्व जिल्ह्यात नाही, असे बोलले जायचे....मात्र, आता कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासन सामान्यांवर बंधने टाकून जे काही जीवाचे रान करतेय, सामन्यांना याचा मोठा फटका सहन करावा लागत आहे. पोटासाठी सामान्यांची वणवण होत असतानाही त्यांच्यासाठी निर्बंध अधिकाधिक कडक केली जात असताना, काँग्रेसच्या कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे यांच्या उपस्थित काँग्रेसची आढावा बैठक चालते आणि तीही कोरेानाचे सर्व नियम धाब्यावर बसवून मग यातून नेमका धडा काय घ्यावा,
प्रशासनाने आपली जबाबदारी पार पाडत यात कारवाई केली आहे... नियम सर्वांसाठी एकच या पद्धतीने त्याची अंमलबजावणी होत असेल, कारवाई सर्वांवर सारखी होत असेल तर प्रशासनाच्या प्रति विश्वासाचा संदेश जनतेत जाईल... विशेष बाब आमदार शिंदे या वारंवार पदाधिकारी व कार्यर्त्यांना सोशल डिस्टन्सिंग पाळा असे सांगत होत्या, मात्र...हीच बाब दुर्लक्षीली गेली...