काँग्रेस, राष्ट्रवादीच्या आंदोलकांचा जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या
By admin | Published: April 11, 2017 05:21 PM2017-04-11T17:21:41+5:302017-04-11T17:21:41+5:30
शेतक:यांना कजर्माफी मिळावी यासह विविध मागण्यासाठी राष्ट्रवादी, काँग्रेस व समाजवादी पक्षाने मंगळवारी दुपारी 2.30 वाजेच्या सुमारास आकाशवाणी चौकात रास्तारोको केला.
Next
शासन व प्रशासनाचा निषेध : जिल्हाधिका:यांनी स्वत: निवेदन स्विकारण्याची मागणी
जळगाव, दि.11- शेतक:यांना कजर्माफी मिळावी यासह विविध मागण्यासाठी राष्ट्रवादी, काँग्रेस व समाजवादी पक्षाने मंगळवारी दुपारी 2.30 वाजेच्या सुमारास आकाशवाणी चौकात रास्तारोको केला. जिल्हाधिका:यांनी स्वत: निवेदन स्विकारावे या मागणीसाठी आंदोलनकर्ते अडून बसल्याने जिल्हाधिकारी कार्यालयात संध्याकाळी 5 वाजेर्पयत ठिय्या आंदोलन सुरुहोते.
शेतक:यांना कजर्माफी मिळावी या मागणीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी व समाजवादी पार्टीतर्फे मंगळवारी आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉ.सतीश पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड.संदीप पाटील, माजी आमदार शिरीष चौधरी, महानगराध्यक्ष डॉ.ए.जी.भंगाळे यांनी आंदोलनाचे नेतृत्त्व केले. सुरुवातीला आकाशवाणी चौकात रास्तारोको आंदोलन करण्यात आले. त्यानंतर आंदोलनकर्ते शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयात आले. या ठिकाणी शेतक:यांच्या विविध मागण्यांचे निवेदन स्विकारण्यासाठी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी स्वत: खाली यावे अशी विनंती आंदोलनकत्र्यानी केली. मात्र जिल्हाधिका:यांनी खाली येण्यास नकार दिला. त्यामुळे चिडलेल्या आंदोलनकत्र्यानी जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन सुरु केले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन व जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्या निषेधाच्या घोषणा सुरु झाल्या. काही महिला पदाधिका:यांनी शासन व प्रशासनाचा निषेध म्हणून बांगडय़ा दाखविल्या. संध्याकाळी 5 वाजेर्पयत ठिय्या आंदोलन व घोषणाबाजी सुरुच होती. आंदोलनात युवक जिल्हाध्यक्ष योगेश देसले, नीलेश पाटील, अॅड.सचिन पाटील, मंगला पाटील, लता मोरे यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी व शेतकरी सहभागी झाले.