चाळीसगावात महिला काँग्रेसतर्फे इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:14 AM2021-07-17T04:14:14+5:302021-07-17T04:14:14+5:30
चाळीसगाव : केंद्रातील भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे महागाई विरोधात पेट्रोल, डिझेल, खाद्य तेल, गॅस व जीवनावश्यक वस्तूंच्या महागाईसंदर्भात ...
चाळीसगाव : केंद्रातील भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे महागाई विरोधात पेट्रोल, डिझेल, खाद्य तेल, गॅस व जीवनावश्यक वस्तूंच्या महागाईसंदर्भात महिला काँग्रेसतर्फे जनआंदोलन करण्यात आले. यावेळी वाढत्या इंधन दरवाढीबाबत मोदी सरकारच्या निषेधार्थ शहरात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. घोषणाबाजीने परिसर दणाणला.
हे आंदोलन चाळीसगाव शहर अध्यक्षा अर्चना पोळ यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार विशाल सोनवणे यांना निवेदन देण्यात आले.
मोर्चात अध्यक्षा अर्चना पोळ, लताबाई पगारे, सुमनबाई मोची, संगीता खरटमल,गिनीन वानखेडे, आरती मोची, सुंदरबाई मोची, कल्पना मोची, मुक्ता पाटील, कठराबाई गवळी, लताबाई पांडे, ज्योती निकम, आश्विनी जाधव, मथुराबाई पवार, वैशाली सोनवणे, छायाबाई खरटमल, उषाबाई मोहरकर, रंजना खरटमल, शारदा कावळे, मंगल खरटमल, शोभा खरटमल, रोहिणी पोळ यांच्यासह काँग्रेस तालुकाध्यक्ष अनिल निकम, शहराध्यक्ष देवेंद्र पाटील, माजी आमदार ईश्वर जाधव, रमेश शिंपी, प्रदेश महासचिव राहुल मोरे, शिवाजी राजपूत, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मधू गवळी, शहराध्यक्ष प्रज्वल राजपूत, लता खलाणे, रवींद्र पोळ, पवनसिंग राजपूत, अलताफखान, रवी जाधव, पंकज शिरोडे व काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.