जळगावात काँग्रेसचे उद्या कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 08:48 PM2018-01-23T20:48:26+5:302018-01-23T20:54:40+5:30
प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी शिक्षणमंत्री प्रा.वसंत पुरके यांची उपस्थिती
आॅनलाईन लोकमत
जळगाव,दि.२३ - आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बुधवार २४ रोजी सकाळी ९ वाजता गोदावरील अभियांत्रिकी महाविद्यालयात काँग्रेसतर्फे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिरासाठी प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्यासह माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी शिक्षण मंत्री प्रा. वसंतराव पुरके, महिला प्रदेशाध्यक्षा चारूलता टोकस, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डॉ.विश्वजीत कदम, अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष राजीव वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याची माहिती जिल्हा काँग्रेसचे प्रभारी विनायक देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली.
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत माहिती देतांना देशमुख यांनी सांगितले की, आगामी काळात होणाºया निवडणुकांसाठी जिल्हानिहाय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर घेण्यात येत आहे. बुधवार २४ रोजी जळगावात शिबिर होणार आहे. याठिकाणी युवक काँग्रेसचेही शिबीर होणार आहे. तर धनाजी नाना महाविद्यालयात महिला काँग्रेसचे शिबिर होणार आहे.
सकाळी ९ ते ११ यावेळेत प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण हे विधानसभा क्षेत्रनिहाय आढावा घेणार आहेत. त्यानंतर शिबिराला सुरुवात होईल. पहिल्या सत्रात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे ‘भारता समोरील आर्थिक आव्हाने’ या विषयावर मार्गदर्शन करतील. माजी मंत्री प्रा.वसंतराव पुरके हे ‘उपेक्षित घटकांबाबतची प्रतिक्षा’ या विषयावर मार्गदर्शन करतील. डॉ.स्मिता शहापूकर या ‘भारतीय लोकशाही समोरील आव्हाने’ याविषयावर तर अभिजीत सपकाळ हे सोशल मिडीयावर मार्गदर्शन करणार आहेत.
दुपारच्या सत्रात महिला आणि युवक काँग्रेसचे शिबीरार्थी जिल्ह्याच्या शिबीरात सहभागी होणार आहे. तिसरे सत्र हे राजकीय विषयावर राहणार आहे. जिल्ह्यातील काँग्रेस संघटन व कामकाजाचा आढावा जिल्हा प्रभारी सादर करतील. त्यानंतर महिला प्रदेशाध्यक्षा चारूलता टोकस, युवकचे प्रदेशाध्यक्ष डॉ. विश्वजीत कदम, आमदार भाई जगताप, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे मार्गदर्शन करतील. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या भाषणाने शिबिराचा समारोप होणार आहे.
संध्याकाळी ६ ते ९ या दरम्यान अशोक चव्हाण हे जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेणार आहेत. त्यानंतर महापालिका आणि अन्य विषयांबाबत जिल्ह्याच्या प्रमुख पदाधिकाºयांसोबत ते बैठक घेतील. यावेळी पत्रकार परीषदेस सहप्रभारी प्रदेश सरचिटणीस डॉ.हेमलता पाटील, प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार डॉ.उल्हास पाटील, प्रदेश सरचिटणीस माजी आमदार शिरीष चौधरी, प्रदेश सचिव डी.जी.पाटील, सरचिटणीस रामकिसन ओझा यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.