शिष्यवृत्तीसाठी पुन्हा ‘ऑनलाइन’ डोकेदुखी!
By admin | Published: September 17, 2015 12:01 AM2015-09-17T00:01:52+5:302015-09-17T00:01:52+5:30
धुळे : शिष्यवृत्तीचा ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी महाविद्यालयीन विद्याथ्र्याना यंदाही संकेतस्थळावर एरर येत असल्याने अडचणींचा सामना करावा लागत आहे.
धुळे : शहरातील विविध महाविद्यालयातील विद्याथ्र्याना गेल्या वर्षी शिष्यवृत्तीसाठी मोठय़ा प्रमाणात अडचणी उद्भविल्यानंतर यंदाही परिस्थिती बदललेली नाही़ शिष्यवृत्तीसाठीचा ऑनलाइन अर्ज पुन्हा एकदा विद्याथ्र्यासाठी डोकेदुखी ठरत आह़े शासनाने शिष्यवृत्ती प्रणालीची अंमलबजावणी सन 2011-12 पासून ऑनलाइन पद्धतीने सुरू केली़ एससी, एसटी, ओबीसी, व्हिजे-एनटी या प्रवर्गातील विद्याथ्र्याना स्कॉलरशिप व फ्रिशिपची सवलत दिली जात़े शिष्यवृत्तीसाठी ओबीसी, एसबीसी, व्हिजे-एनटी संवर्गातील विद्याथ्र्याना एक लाखार्पयतच्या उत्पन्नाचा दाखला द्यावा लागतो़ तर फ्रीशिपसाठी ही मर्यादा साडेचार लाखांर्पयत आह़े एससी व एसटी संवर्गातील विद्याथ्र्याना स्कॉलरशिपसाठी दोन लाखांर्पयतचे उत्पन्न अपेक्षित असून फ्रीशिपसाठी कोणत्याही प्रकारची मर्यादा नाही़ समस्या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळावा यासाठी विद्याथ्र्याचे अर्ज समाज कल्याण विभागाच्या संकेतस्थळावर दरवर्षीप्रमाणे मागविण्यात येत आहे. मात्र, यासाठी दिलेल्या संकेतस्थळावर विद्याथ्र्याना विविध प्रकारच्या अडचणी येत आहेत़ एकदाच भरावा लागणार अजर् राज्यात शैक्षणिक वर्ष 2010-11 पासून मान्यता प्राप्त महाविद्यालयातील मान्यता असलेल्या अभ्यासक्रमांसाठी शिष्यवृत्तीचा लाभ दिला जात आहे. पण वारंवार होणारे विद्याथ्र्याचे हाल लक्षात घेऊन शासनाने चालू वर्षापासून केवळ प्रथम वर्षाच्या विद्याथ्र्यानाच ऑनलाइन अर्ज भरणे अनिवार्य केले आह़े मात्र, विद्याथ्र्याचा प्रवेश ज्या महाविद्यालयात असेल त्या महाविद्यालयांनी शिष्यवृत्तीसाठी पात्र विद्याथ्र्याचे अर्ज समाज कल्याण विभागाकडे नूतनीकरण करण्यासाठी दरवर्षी पाठवावे, असे आवाहन समाज कल्याण विभागातर्फे करण्यात आले आहे. अजून तक्रारी नाही विद्याथ्र्याना गेल्या वर्षी शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरताना अडचणी आल्यामुळेच यंदा शासनाने केवळ प्रथम वर्षाच्या विद्याथ्र्याना अर्ज भरणे अनिवार्य केल्याने या वर्षी तक्रारी येणार नाहीत, अशी अपेक्षा समाज कल्याण विभागाला आह़े
.-------
गेल्या वर्षी विद्याथ्र्याच्या तक्रारी आल्या होत्या, पण या वर्षी केवळ प्रथम वर्षाच्याच विद्याथ्र्याना अर्ज भरावयाचे असल्याने तक्रारी येणार नाहीत़ त्याचप्रमाणे विद्याथ्र्यानी प्रवेश घेतानाच कोणत्या अभ्यासक्रमाला व जातीच्या संवर्गाला शिष्यवृत्ती देय आहे, हे तपासले पाहिज़े विद्यार्थी ते तपासत नाही. त्यामुळे अडचणी वाढतात़ -वैशाली हिंगे, सहायक आयुक्त, समाज कल्याण