जळगाव जिल्ह्याला दिलासा.... १७ कोरोनामुक्त, ५९ जण निगेटीव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2020 12:46 PM2020-05-17T12:46:27+5:302020-05-17T12:48:26+5:30
जळगाव : गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाना रविवारी जळगाव जिल्ह्याला दिलासा मिळाला. सकाळी अमळनेरात १७ रुग्णांना ...
जळगाव : गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाना रविवारी जळगाव जिल्ह्याला दिलासा मिळाला. सकाळी अमळनेरात १७ रुग्णांना दहा दिवसाच्या नियमानुसार लक्षणे नसल्याने घरी सोडण्यत आले आहे़ यासह जळगावच्या कोरोना रुग्णालयातूनही दोन रुग्णांना घरी सोडण्याची प्रक्रिया सुरू होती़ दरम्यान, शनिवारी रात्री उशिरा ५९ अहवाल प्राप्त झाले असून ते निगेटीव्ह आले आहेत़ त्यामुळे या दोनही घटना जिल्ह्यासाठी दिलासादायक ठरल्या.
अमळनेरला बे्रेक, जळगाव, भुसावळ सुसाट
जिल्ह्यात सर्वात मोठे हॉटस्पॉट असलेल्या अमळनेरात गेल्या पाच ते सहा दिवसांपासून दिलासा मिळत असताना जळगाव व भुसावळात मात्र, वेगाने रुग्ण संख्या वाढत आहे़ केवळ तीन चार तालुक्यांमध्येच तीन दिवसात ४७ रुग्णांची वाढ झालेली आहे़ यात भडगाव व धरणगाव या नवीन तालुक्यांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आहे़ अशी परिस्थिती असताना जळगाव शहरात मात्र लॉकडाऊनचे गांभीर्याने पालन होत नसल्याचे चित्र आहे़
५९ अहवाल निगेटीव्ह, भडगावात दिलासा
भडगावच्या बाधित रुग्णांच्या संपर्कातील संशयित रुग्णांपैकी ५९ जणांचे तपासणी अहवाल प्राप्त झाले असून ते सर्व अहवाल निगेटीव्ह आल्याने भडगावात दिलासा मिळाला आहे़ भडगावातही अचानक दोन ते तीन दिवसातच रुग्ण संख्या ८ वर पोहचलेली आहे़
अमळनेरात सकारात्मक बदल
जिल्हाभरातील २५७ रुग्णांमध्ये १०५ रुग्ण हे एकट्या अमळनेर येथील आहे़ अमळनेरात एक ते शंभर रुग्ण होण्यासाठी केवळ दोन आठवड्यांचा अवधी लागला होता़ मात्र,एका आठवड्यात अमळनेरात आता केवळ तीन रुग्ण आढळून आले आहेत. शिवाय बरे होणाऱ्यांची संख्याही ४७ वर पोहचलेली आहे़ त्यामुळे अमळनेरात एक दिलासादायक बदल समोर येत आहे़