विद्यार्थ्यांना दिलासा ! आता २७ सप्टेंबरपर्यंत भरता येणार विकल्प अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2020 14:52 IST2020-09-21T14:52:36+5:302020-09-21T14:52:50+5:30
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या (बॅकलॉगसह) विद्यार्थ्यांना परीक्षेच्या अनुषंगाने विकल्प अर्ज ऑनलाईन भरण्यासाठी आता२७ ...

विद्यार्थ्यांना दिलासा ! आता २७ सप्टेंबरपर्यंत भरता येणार विकल्प अर्ज
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या (बॅकलॉगसह) विद्यार्थ्यांना परीक्षेच्या अनुषंगाने विकल्प अर्ज ऑनलाईन भरण्यासाठी आता२७ सप्टेंबरपर्यंत मुदत वाढविण्यात आली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना दिसाला मिळाला आहे.
विद्यापीठाने एम.के.सी.एल. द्वारे विकसित डीयू पोर्टल (विद्यापीठाच्या http://numj. digitaluniversity.ac या संकेतस्थळावर) विद्यार्थ्यांच्या ई-सुविधा अकांउट मध्ये विकल्प पर्याय निवडण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यापुर्वी १९ सप्टेंबर मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र अजूनही विद्यार्थ्यांना अर्ज भरत असताना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे विद्यापीठाने २७ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे.
विकल्प अर्ज भरून देणेसाठी विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या http://numj.digitaluniversity.ac या संकेतस्थळावर जाऊन ई-सुविधा अकाऊंटमध्ये विलींगनेस टू ॲपियर इन एक्झाम या लिंक ला क्लिक करून विकल्प सादर करायचा आहे. सदर विलिंकगनेस अर्ज फक्त २०१९-२० मध्ये पदवी, पदविका आणि पद्व्युत्तर अभ्यासक्रमाच्या अंतीम वर्षात प्रविष्ठ असलेल्या किंवा अंतिम वर्ष उत्तीर्ण, अनुत्तीर्ण होऊन मागील सत्र , वर्षातील असलेल्या विद्यार्थ्यांनी भरावयाचे आहे.
रेग्यूलर विषय दिसेना...
अर्ज भरताना विद्यार्थ्यांच्या तांत्रिक अडचणींचा सामना तर करावा लागत आहे. दुसरीकडे हॉलकितिकटमध्ये मागील विषय उत्तीर्ण असताना तो विषय नापास दाखविण्यात आला आहे तर काही हॉलतिकिटमध्ये रेग्युलर विषयचं दाखविल्यात आले नसल्याचाही प्रकार समोर येत आहे. त्यामुळे परीक्षांच्या आधी संपूर्ण अडचणी सोडविण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे.