शैक्षणिक अभ्यासक्रमात संविधान लागू करण्यासाठी संविधान रथ

By admin | Published: May 23, 2017 05:38 PM2017-05-23T17:38:36+5:302017-05-23T17:38:36+5:30

एडवीन भारतीय : महाराष्ट्रात दिड वर्ष तर संपूर्ण भारतात सात वर्षात जनजागृतीचा मानस

Constitution Rath to apply constitution to educational curriculum | शैक्षणिक अभ्यासक्रमात संविधान लागू करण्यासाठी संविधान रथ

शैक्षणिक अभ्यासक्रमात संविधान लागू करण्यासाठी संविधान रथ

Next
>ऑनलाईन लोकमत
भुसावळ, दि.23- महामानव डॉ़बाबासाहेब आंबेडकर यांच्या मध्यप्रदेशातील महू येथील निघालेल्या संविधान रथाद्वारे संविधानाविषयी जनजागृती करण्यात येत आहे. पहिली ते आठवीच्या अभ्यासक्रमात संविधान हा विषय घेतला जावा यासाठी हा रथ काढण्यात आल्याची माहिती व्हिजन ऑफ बाबासाहेब वेलफेअर असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष एडवीन भारतीय यांनी येथे दिली़
शहरातील शासकीय विश्रामगृहावर त्यांनी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला़ ते म्हणाले की, संविधानाचा विषय अभ्यासक्रमात आल्यानंतर युवकांना हक्क व कर्तव्याची  जाण होईल़ देशभरात 30 कोटी संविधान वाटपाचे उद्दिष्ट आह़े नगराध्यक्ष रमण भोळे, नगरसेवक रवींद्र खरात, सुशीला भारतीय, लक्ष्मण जाधव, रमेश अंभोरे, दादा निकम, प्रशांत नरवाडे आदींची उपस्थिती होती़

Web Title: Constitution Rath to apply constitution to educational curriculum

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.