पोलिसांसाठी ५५ हजार घरांचे बांधकाम : महसूलमंत्री चंद्रकांत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2017 05:49 PM2017-08-14T17:49:10+5:302017-08-14T17:55:08+5:30

भुसावळ येथे पोलीस उपअधीक्षक कार्यालय, तालुका पोलीस स्टेशनच्या प्रशासकीय इमारतीचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन झाले.

Construction of 55 thousand houses for police: Revenue Minister Chandrakant Patil | पोलिसांसाठी ५५ हजार घरांचे बांधकाम : महसूलमंत्री चंद्रकांत पाटील

पोलिसांसाठी ५५ हजार घरांचे बांधकाम : महसूलमंत्री चंद्रकांत पाटील

Next
ठळक मुद्देगुन्हेगारांना शिक्षेचे प्रमाण ९ वरून ४२ टक्क्यांवरपोलिसांनी जनतेसोबत माणुसकीने वागण्याचा सल्ला४.२५ कोटी रकमेची इमारत राहिली एक वर्षात उभी

आॅनलाईन लोकमत
भुसावळ,दि.१४ - पोलिसांसाठी राज्यात ५५ हजार घरांचे बांधकाम सुरू असल्याची माहिती महसूल, मदत व पुनर्वसन, सार्वजनिक बांधकाम आणि  जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी भुसावळात दिली.
महाराष्टÑ राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळातर्फे बांधण्यात आलेल्या उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, भुसावळ तालुका पोलीस ठाण्याच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे त्यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जलसंपदा व वैद्यकिय शिक्षणमंत्री गिरीश महाजन होते. प्रमुख म्हणून सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे उपस्थित होते.
चंद्रकांत पाटील बोलताना म्हणाले तीन वर्षापूर्वी  गुन्हेगारांना शिक्षेचे प्रमाण ८ ते ९ टक्के होते. ते आता तीन वर्षांपासून ४२ टक्यांवर आले आहे. त्यामुळे  गुन्हेगारांवर नियंत्रण मिळविता आले आहे.
पोलिसांनी तक्रार येताच गुन्ह्याची नोंद करुन त्याचा तपास तप्तरतेने करायला हवा.पोलीस ठाण्यात आलेल्यांना चांगली वागणूक द्या.माणुसकी जपा असा सल्ला त्यांनी दिला. चांगल्या माणसांना अभय व गुन्हेगारांवर वचक  राहायला हवा,अशी भूमिका त्यांनी मांडली.
जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराडे यांनी प्रास्तावि केले. एक वर्षाच्या काळात इमारत उभी राहीली. बांधकामासाठी ४.२५ कोटी रुपये खर्च आला. इमारतीसाठी अडीच हेक्टर जागा आहे. १५ हजार स्क्वे.फुटवर बांधकाम करण्यात आले आहे. पोलिसांची जबाबदारी वाढली आहे. इमारतीला साजेसे काम करावे लागेल. कार्पोरेट सर्व्हिस द्यावी लागेल, असे ते म्हणाले. तू आणि मी हे सोडून आम्ही सर्व जण मिळून चांगला समाज घडवू असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. यावेळी जनजागृतीसाठी शहरासह जिल्हा भरातील गणेश मंडळांना अडीच हजार आॅडीओ सीडींचे वाटप करण्यात आले.

Web Title: Construction of 55 thousand houses for police: Revenue Minister Chandrakant Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.