इमारतींचे बांधकाम रखडल्याने जळगावातील 144 घरकुले होणार रद्द

By admin | Published: April 6, 2017 11:05 AM2017-04-06T11:05:54+5:302017-04-06T11:05:54+5:30

मुदत संपूनही अद्याप 1411 घरकुलांचा समावेश असलेल्या 3 इमारतींच्या कामास सुरूवातच झालेली नाही. त्यामुळे ही घरकुले रद्द होण्याची शक्यता आहे.

With the construction of buildings, 144 houses in Jalgaon will not be canceled | इमारतींचे बांधकाम रखडल्याने जळगावातील 144 घरकुले होणार रद्द

इमारतींचे बांधकाम रखडल्याने जळगावातील 144 घरकुले होणार रद्द

Next

 जळगाव,दि.6-एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी विकास योजनेंतर्गत (आयएचएसडीपी ) मनपाने दांडेकरनगर झोपडपट्टीतील नागरिकांसाठी पिंप्राळा हुडको येथे 472 घरकुलांची योजना राबविण्यासाठी घेतली होती. मात्र मार्च 2017 अखेर या योजनेची मुदत संपूनही अद्याप 1411 घरकुलांचा समावेश असलेल्या 3 इमारतींच्या कामास सुरूवातच झालेली नाही. त्यामुळे ही घरकुले रद्द होण्याची शक्यता आहे. दरम्यान मनपाने मात्र आणखी वर्षभराची मुदत मिळावी यासाठी शासनाकडे मागणी केली आहे. 

जळगाव महापालिकेने रेल्वे लाइनजवळील दांडेकर नगर झोपहपट्टी धारकांसाठी शासनाच्या आयएचएसडीपी योजनेतंर्गत पिंप्राळा शिवारातील गट न. 214 येथे भाग 1 वर घरकुल योजनेला  मंजुरी दिली होती.  त्यानुसार 15 जानेवरी 2013 रोजी या कामास सुरुवात करण्यात आली. योजनेतंर्गत 472 घरकुलांचे काम करण्यात येणार होते. त्यासाठी मनपाने पहिल्या टप्प्यात 252 घरकुले बांधून पूर्ण करण्यात आली आहेत. तर दुस :या टप्प्यातील 212 घरांच्या कामांना सुरुवात करण्यात आली आहे. त्यापैकी 76 घरकुले एप्रिल अखेर पूर्ण केली जाणार आहेत. शासनाने हे काम 31 मार्च 2017 पयर्ंत पूर्ण करण्याची मुदत दिली असली तरी ते काम 31 डिसेंबर 2016 पयर्ंतच पूर्ण केले जाईल, असे मनपा बांधकाम विभागातर्फे सांगितले जात होते. मात्र झोपडय़ा हटवून बांधकामासाठी जागा मोकळी करून देण्यास वेळ गेल्याने तसेच मक्तेदार वाढीव मोबदल्यासाठी अडून बसल्याने त्यास मंजुरी येईर्पयत काम बंद राहिल्याने 6-7 महिन्यांचा कालावधी वाया गेला. 
सुधारित अनुदानाचा प्रस्ताव मंजूर
ही मूळ योजना 11 कोटी 97 लाख रुपयांची होती. योजना सुरू होऊन तीन वर्ष  उलटूनही काम रखडल्याने योजनेची किंमत वाढली. त्यामुळे महापालिकेने शासनाकडे सुधारित अनुदानाचा प्रस्ताव दिला. राज्य शासन व केंद्र शासनाकडून प्रस्ताव मंजूर करण्यात आला. मात्र त्यात किमान सहा महिन्यांचा कालावधी वाया गेला. या कामासाठी शासनाने पहील्या टप्प्यात 3 कोटी 96 लाख रुपये तर दुस:या टप्प्यात 53 लाख 27 हजार दिले आहे.

Web Title: With the construction of buildings, 144 houses in Jalgaon will not be canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.