बांधकाम विभागाची बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:46 AM2021-02-20T04:46:50+5:302021-02-20T04:46:50+5:30
शिक्षण विभाग पुन्हा चर्चेत जळगाव : शिक्षण विभागात कर्मचारी थांबत नसल्याच्या तक्रारी अनेक वेळा समोर आल्या होत्या. सामान्य ...
शिक्षण विभाग पुन्हा चर्चेत
जळगाव : शिक्षण विभागात कर्मचारी थांबत नसल्याच्या तक्रारी अनेक वेळा समोर आल्या होत्या. सामान्य प्रशासन विभागाच्या पथकाने अचानक पाहणी करून स्वाक्षरी करून बाहेर गेलेल्या पाच कर्मचाऱ्यांना नोटीस दिल्याने पुन्हा हा विभाग या कारणाने चर्चेत आला आहे. गेल्या वेळीही या विभागातील ११ कर्मचाऱ्यांना नोटिसा देण्यात आल्या होत्या.
वेग मंदावला
जळगाव : कोरोना लसीकरणाचा वेग पुन्हा मंदावला आहे. गुरुवारी ९०० पेक्षा अधिक जणांनी लस घेतली होती. शुक्रवारी ही संख्या पुन्हा रोडावली व ६६६ जणांनी लस घेतली. तर १७४ जणांनी लसीकरणाचा दुसरा डोस घेतला. यात काही डॉक्टरांचा समावेश आहे. ९८५ जणांनी लसीकरणाचा दुसरा डोस घेतला आहे.
मृत्युदर घटला
जळगाव : रुग्णवाढ समोर येत असली तरी जिल्ह्यातील मृत्युदर प्रथमच २.३७ टक्क्यांच्या खाली २.३५ टक्के नोंदविण्यात आला आहे. रुग्ण वाढल्याने हा दर चार महिन्यात प्रथमच दोन अंशानी कमी झाला आहे. रिकव्हरी रेट मात्र घटला आहे. शुक्रवारी ३९ जण कोरोनातून बरे झाले.
चाळीसगावात शंभरी पार
जळगाव : चाळीसगावात सलग रुग्णवाढ होत असून शुक्रवारी २२ रुग्ण समोर आले आहेत. सक्रिय रुग्णांची संख्या १०४ वर पोहोचली आहे. काही तालुक्यांमध्ये रुग्णवाढ समोर येत असल्याने चिंता वाढली आहे. यात चाळीसगाव, भुसावळ, अमळनेर यांचा समावेश आहे. जळगाव ग्रामीणमध्येही एक बाधित रुग्ण समोर आला आहे.