भुसावळातील दोन हजार जप्त मालमत्तांना मिळेना ग्राहक
By admin | Published: May 21, 2017 04:32 PM2017-05-21T16:32:54+5:302017-05-21T16:32:54+5:30
भुसावळ नगरपालिकेने पहिल्या टप्प्यातील 1197 व 900 मालमत्ता धारकांना नोटीसा बजावून त्यांची लिलाव प्रक्रिया सुरु केली आहे.
Next
ऑनलाईन लोकमत विशेष /गणेश वाघ
भुसावळ, दि.21- नगरपालिकेची थकबाकी न भरणा:या शहरातील तब्बल 13 हजार मालमत्ता धारकांना जप्तीच्या नोटीसा बजावण्यात आल्यानंतर पालिकेने पहिल्या टप्प्यातील 1197 व 900 मालमत्ता धारकांना नोटीसा बजावून त्यांची लिलाव प्रक्रिया सुरु केली आहे. मात्र प्रत्यक्षात कुणीही या मालमत्ता घेण्यास न धजावल्याने पालिकेच्या उत्पन्न वाढीच्या निर्णयावर पाणी फेरले गेल़े
दरम्यान, एक रुपया नाममात्र बोलीने लिलाव प्रक्रिया राबवण्यासाठी जिल्हाधिका:यांकडे लवकरच प्रस्ताव पाठवून मंजुरी मिळवणार असल्याची माहिती मुख्याधिकारी बी़टी़बाविस्कर यांनी दिली़ या माध्यमातून सुमारे दोन कोटी रुपयांची थकबाकी पालिका वसुल करणार आह़े
वर्षानुवर्षे थकबाकी भरण्यासंदर्भात पालिकेने आवाहन केल्यानंतरही मालमत्ताधारक पालिकेची थकबाकी भरत नसल्याने पालिकेने काही दिवसांपूर्वी थकबाकीदारांची नावे वृत्तपत्रात प्रसिद्ध करून थकबाकीदारांना नोटीसा बजावल्या होत्या. मात्र त्यानंतरही नागरिकांनी थकबाकी न भरल्याने पालिकेने 1197 व नंतर 900 नागरिकांच्या रहिवासी घरासह इमारतींच्या लिलावाची प्रक्रिया काही दिवसांपूर्वीच पार पाडली़ सुमारे दोन हजार मालमत्ता धारकांच्या मालमत्ता लिलावासाठी काढूनही कुणीही बोली न बोलल्याने पालिकेच्या उत्पन्न वाढीच्या प्रयत्नांवर पाणी फेरले गेल़े आता जिल्हाधिका:यांकडे एक रुपये बोलीसाठी प्रस्ताव पाठवला जाईल़
पालिकेच्या करांची थकबाकी न भरणा:या तब्बल 13 हजार मालमत्ताधारकांना नगरपालिकेने नोटीसा बजावल्या आहेत़ पहिल्या टप्प्यात सुमारे दोन हजार मालमत्ता धारकांकडील रहिवासी जागा, इमारती, प्लॉट तसेच अन्य मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत़ लिलाव प्रक्रिया कुणीही पुढे न आल्याने जिल्हाधिका:यांच्या परवानगीनंतर पुन्हा एक रुपया बोलीने मालमत्तांचा लिलाव करण्यात येईल़
शहरात विविध विकासाची कामे करण्यासाठी नागरिकांनी पालिकेची थकबाकी भरणे हे त्यांचे कर्तव्य आहे मात्र नागरिक थकबाकी भरत नसल्याने दिवसागणिक कर वाढतच असल्याने शहरात विकासकामे रखडली आहेत़ शेवटची संधी समजून करांचा भरणा करावा, असे आवाहन मुख्याधिका:यांनी केले आह़े