भुसावळात भाजीपाल्याचे दर उतरल्याने दिलासा

By admin | Published: June 3, 2017 12:41 PM2017-06-03T12:41:52+5:302017-06-03T12:41:52+5:30

दोन दिवसांपासून आवक कमी झाली असतानाच शनिवारी मात्र दुपारी 12 वाजेर्पयत धान्यच आले नसल्याचे

Consumption of vegetable prices in Bhusal | भुसावळात भाजीपाल्याचे दर उतरल्याने दिलासा

भुसावळात भाजीपाल्याचे दर उतरल्याने दिलासा

Next

ऑनलाईन लोकमत

भुसावळ, जळगाव, दि. 3 - शेतकरी कजर्माफीसह विविध मागण्यांसाठी 1 जूनपासून सुरू झालेल्या बळीराजाच्या संपाचा फटका शहरातील कृउबाला मोठय़ा प्रमाणावर बसला आह़े गेल्या दोन दिवसांपासून आवक कमी झाली असतानाच शनिवारी मात्र दुपारी 12 वाजेर्पयत धान्यच आले नसल्याचे सूत्रांनी सांगितले तर दुसरीकडे शुक्रवारी 80 रुपये किलोंवर पोहोचलेल्या टमाटय़ांचे दर शनिवारी 40 रुपयांवर आल्याने ग्राहकांना काहिसा दिलासा मिळाला़ दरम्यान भाजीपाल्याच्या दरातही घट झाल्याचे सांगण्यात आल़े
शहर व लगतच्या परीसरातील खेडय़ातून भाजीपाला विक्रीसाठी येणारे शेतकरी संपामुळे शहरात दाखल होत नसले तरी अन्य ठिकाणाहून मात्र मिरच्या व अन्य भाज्यांची आवक होत असल्याने दररोज पहाटे भाजीपाल्यांचे लिलाव होत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितल़े शनिवारी भाज्यांचे दर आवाक्यात असल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला़

Web Title: Consumption of vegetable prices in Bhusal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.