मुक्ताईनगरला दूषित पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:12 AM2021-07-20T04:12:31+5:302021-07-20T04:12:31+5:30

मुक्ताईनगर : शहरात नेहमी होणाऱ्या दूषित व गढूळ पाणीपुरवठ्याच्या विरोधात मुक्ताईनगर शहर काँग्रेसतर्फे नगरपंचायत कार्यालयात खाली बसत ...

Contaminated water supply to Muktainagar | मुक्ताईनगरला दूषित पाणीपुरवठा

मुक्ताईनगरला दूषित पाणीपुरवठा

Next

मुक्ताईनगर : शहरात नेहमी होणाऱ्या दूषित व गढूळ पाणीपुरवठ्याच्या विरोधात मुक्ताईनगर शहर काँग्रेसतर्फे नगरपंचायत कार्यालयात खाली बसत धरणे आंदोलन केले.

शहरात पुरवठा होणाऱ्या पाण्याचे नमुने घेऊन अनुजैविक तपासणी करावी व बॅक्टेरिअल इनस्पेक्शन करुन गुणवत्ता तपासणी करावी व उपाययोजना कराव्या अशी मागणी काँग्रेसतर्फे करण्यात आली आहे. आरोग्य विभाग ,स्वच्छता तसेच पाणीपुरवठा विभागाकडून पावसाळ्याच्या तोंडावर वारंवार तपासणी करून शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी निकाली काढावा नाहीतर शहर काँग्रेसतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शहराध्यक्ष प्रा.पवन खुरपडे यांनी दिला आहे.

याप्रसंगी काँग्रेसचे ॲड. अरविंद गोसावी , मागास विभाग जिल्हा उपाध्यक्ष बी. डी. गवई, यासिन खान, , ॲड. राहुल पाटील, संजय पाटील, राजू जाधव, निखिल चौधरी , युवक विधानसभा अध्यक्ष नीरज बोराखेडे, निलेश भालेराव, शकील आझाद, आरिफ रब्बानी, वसीम शेख, आनंदा कोळी, महेश खुळे, मितेश भालेराव आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

फोटो

नगरपंचायत कार्यालयामध्ये धरणे आंदोलन करताना बी. डी. गवई , प्रा.पवन खुरपडे , ॲड. अरविंद गोसावी आदी. ( छाया: विनायक वाडेकर)

Web Title: Contaminated water supply to Muktainagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.