फैजपूर प्रांत कार्यालयात डिजीटल स्वाक्षरीचे दाखले देणे सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2018 11:44 PM2018-10-28T23:44:03+5:302018-10-28T23:45:39+5:30
फैजपूर येथे उपविभागीय कार्यालयातून देण्यात येत असलेले शैक्षणिक व जातीचे दाखले डिजिटल स्वरुपात वाटप करण्यात येत आहे. यात प्रांताधिकाऱ्यांची डिजीटल स्वाक्षरी मिळणाºया दाखल्यावर असणार आहे.
फैजपूर, जि.जळगाव : फैजपूर येथे उपविभागीय कार्यालयातून देण्यात येत असलेले शैक्षणिक व जातीचे दाखले डिजिटल स्वरुपात वाटप करण्यात येत आहे. यात प्रांताधिकाऱ्यांची डिजीटल स्वाक्षरी मिळणाºया दाखल्यावर असणार आहे. फैजपूर प्रांत कार्यालयात आॅनलाईन सुविधा ही १२ आॅक्टोबरपासून सुरू झाली आहे. आतापर्र्यंत प्रांत कार्यालयातून डिजिटल स्वाक्षरीचे ११० दाखल्यांचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती प्रांतधिकारी डॉ.अजित थोरबोले यांनी दिली.
पूर्वी नागरिकांना विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक दाखल्यासाठी पालकांना दलालांमार्फत नॉन क्रिमिलर, जातीचा दाखला, डोमीसाइल व इतर दाखले जास्तीचे पैसे देवून मिळवत होते. दाखले घेण्यासाठी शासकीय फीच्या व्यतिरिक्त दलालांकडून जादा पैसे मोजावे लागत होते पण या आॅनलाईन डिजिटल् मुळे ५५ ते ७५ रुपयात आता दाखले मिळणार आहेत. यात पूर्वी पंधरा दिवसात दाखले मिळत होते आता तेच दाखले काही तासातच नागरिकांना उपलब्ध होत आहे आतापर्यंत फैजपूर प्रांत कायार्लायातून ११० दाखल्याचे वाटप करण्यात आले आहे. यामुळे नागरिकांचा वेळ, पैसा आणि दलालांपासून सुटका होणार आहे. आॅनलाईन डीजीटल दाखले करण्यसाठी फैजपूर उपविभागाचे प्रांतधिकारी डॉ अजित थोरबोले यांनी सप्टेंबर महिन्यात यावल रावेर तालुक्यातील सेतू सुविधा केंद्र प्रमुख यांची संयुक्त बैठक बोलवण्यात आली होती. त्यात डॉ थोरबोले यांनी आॅनलाईन डिजिटल स्वाक्षरीसंदर्भात सविस्तर माहिती दिली होती.
जातीच्या दाखल्यासाठी पूर्वी झेरॉक्स कागदपत्रे जोडल्यानंतर जातीचे दाखले मिळत होते. पण आता आॅनलाईन डिजिटल झाल्यामुळे मूळ कागदपत्र जोडावी लागणार आहे. दाखल्यांचे प्रकरण दाखल केल्यानंतर संबधित व्यक्तींना त्यांचे मूळ कागदपत्र परत मिळणार आहे. त्यामुळे झेरॉक्स प्रत आता जोडता येणार नाही.