कंत्राटी व आऊटसोर्सिग वीज कामगार 22 मे पासून बेदमुत संपावर

By admin | Published: May 18, 2017 06:26 PM2017-05-18T18:26:45+5:302017-05-18T18:26:45+5:30

निर्णय न झाल्याने दुस:या टप्प्यात बेमुदत संपाचे हत्यार उपसण्यात येणार आह़े

Contract and Outsourcing Electricity Workers aborted from May 22 | कंत्राटी व आऊटसोर्सिग वीज कामगार 22 मे पासून बेदमुत संपावर

कंत्राटी व आऊटसोर्सिग वीज कामगार 22 मे पासून बेदमुत संपावर

Next

ऑनलाइन लोकमत

जळगाव, दि. 18 -  सरकार व व्यवस्थापनासोबत अनेक बैठका, चर्चा, आंदोलने, निदर्शने करूनही कंत्राटी तसेच आऊटसोर्सिग वीज कामगारांच्या प्रलंबित मागण्यांबाबत कुठलाही निर्णय न झाल्याने दुस:या टप्प्यात बेमुदत संपाचे हत्यार उपसण्यात येणार आह़े 22 मे पासून जळगाव जिल्ह्यातील महापारेषण, महानिर्मिती तसेच महावितरणमधील कंत्राटी व आऊटसोर्सिग कामगार हे बेमुदत संपावर जाणार आहेत़
विविध मागण्यांसाठी 4 वर्षापासून कृती समितीतील संघटनांतर्फे पाठपुरावा करण्यात येत आह़े रानडे समिती, अनुराधा भाटीया समिती समोर संघटनांनी अनेक राज्य सरकारे व न्यायालयीन निवाडे सादर केले मात्र तरी देखील मागण्यांबाबत निर्णय झाला नाही़ निदर्शनानंतर आता दुस:या टप्प्यात संघटनांनी 22 मे पासून मागण्या मान्य होईर्पयत बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आह़े त्यानुसार जळगाव, धुळे व नंदुरबार परिमंडळातील कर्मचा:यांनी मोठय़ा संख्येने सहभागी होवून बंद 100 टक्के यशस्वी करावा, असे आवाहन महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसीटी वर्कर्स फेडरेशनचे विभागीय सचिव अरविंद देवरे, सर्कल सेकेट्ररी विरेंद्रसिंग पाटील यांनी केले आह़े

Web Title: Contract and Outsourcing Electricity Workers aborted from May 22

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.