बसस्थानकातील `उपाहारगृहा`चा ठेका मुदतीआधीच समर्पिंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:19 AM2021-07-07T04:19:07+5:302021-07-07T04:19:07+5:30

जळगाव : कोरोनामुळे गेल्या वर्षी आणि यंदाही एप्रिल-मे महिन्यात महामंडळाची सेवा बंद होती. त्यामुळे जळगाव बसस्थानकातील `उपाहारगृह``ही ...

The contract for the restaurant at the bus stand has been submitted ahead of time | बसस्थानकातील `उपाहारगृहा`चा ठेका मुदतीआधीच समर्पिंत

बसस्थानकातील `उपाहारगृहा`चा ठेका मुदतीआधीच समर्पिंत

Next

जळगाव : कोरोनामुळे गेल्या वर्षी आणि यंदाही एप्रिल-मे महिन्यात महामंडळाची सेवा बंद होती. त्यामुळे जळगाव बसस्थानकातील `उपाहारगृह``ही बंद होते. त्यामुळे अपेक्षित उत्पन्न न येता, आर्थिक नुकसान होत असल्यामुळे हॉटेल व्यावसायिक भागवत भंगाळे यांनी महामंडळाकडून चालवायला घेतलेले नवीन बसस्थानकातील`उपाहारगृह` मुदत संपण्याच्या १३ वर्षे आधीच रद्द करून, हे `उपाहारगृह` आगार प्रशासनाकडे सुपूर्द केले आहे. दरम्यान, हे `उपाहारगृह``आता बंद झाल्यामुळे, प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेता, ते पुन्हा सुरू करण्याबाबत महामंडळ प्रशासनातर्फे पुन्हा निविदा काढण्याचे नियोजन सुरू आहे.

बसस्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वाराला लागून असलेले लहान आकाराचे `उपाहारगृह` १ जुलै २००९ मध्ये हॉटेल व्यावसायिक भागवत भंगाळे यांनी सुरेखा भागवत भंगाळे यांच्या नावाने महामंड‌‌ळाकडे रितसर करारनामा करून चालवायला घेतली होते.

चौकट :

सुरुवातीला आगार प्रशासनातर्फे नऊ वर्षांचा करारनामा करून, उपहारगृह असलेल्या इमारतीच्या भाड्यापोटी १३ हजार ५०१ रुपये इतके भाडे आकारण्यात आले होते. त्यानंतर पाच वर्षांनी या भाड्यात दर वर्षा १० टक्के याप्रमाणे भाडेवाढ लागू करण्यात आली. पहिला करारनामा संपल्यानंतर, पुन्हा भागवत भंगाळे यांनी २० सप्टेंबर २०१९ मध्ये या करार नाम्याची मुदत वाढवून, २० सप्टेंबर २०३३ पर्यंत केला होता.

कोरोनामुळे व्यवसाय मंदावल्याने उपहारगृहाचा मक्ता रद्द

गेल्या वर्षी कोरोना संसर्ग सुरू झाल्यापासून, या उपाहारगृहावरही मोठा परिणाम झाला. कोरोनामुळे सुरुवातीला सहा महिने बससेवा बंद असल्यामुळे, परिणामी हे उपाहारगृहही बंद ठेवावे लागले होते. त्यानंतर बससेवा सुरू झाल्यावर पुन्हा उपहारगृह सुरू करण्यात आले. मात्र, कोरोनामुळे बहुतांश नागरिक बाहेरील खाणे-पिणे टाळत असल्यामुळे, या उपाहारगृहाची ग्राहकसंख्या मोठ्या प्रमाणावर मंदावली होती. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून उपाहारगृहाचे अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्यामुळे, भंगाळे यांनी सप्टेंबर २०३३ मध्ये संपणारा उपहारगृहाचा मक्ता, मुदतपूर्वीच महामंडळाकडे सुपूर्द केला आहे.

इन्फो :

जळगाव बसस्थानकातील चालवायला दिलेले `उपाहारगृह`संबंधित व्यावसायिकांनी कोरोनामुळे आर्थिक नुकसान होत असल्यामुळे, या मक्त्याची मुदत संपण्यापूर्वीच ते `उपाहारगृह` आगार प्रशासनाकडे सुपूर्द केले आहे. त्यामुळे पुन्हा हे `उपाहारगृह` चालविण्याबाबत लवकरच महामंडळातर्फे नवीन निविदाप्रक्रिया काढण्यात येणार आहे.

दिलीप बंजारा, विभागीय वाहतूक अधिकारी

Web Title: The contract for the restaurant at the bus stand has been submitted ahead of time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.