वैद्यकीय शिक्षणाच्या विद्यार्थ्यांसाठी जळगावात दोन वसतीगृहांशी करार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 12:51 PM2018-06-20T12:51:19+5:302018-06-20T12:51:19+5:30
प्रक्रियेनंतर वसतीगृहात प्रवेश
जळगाव : जळगाव येथे सुरू होणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी शहरात दोन वसतीगृह राहणार असून त्यासाठी संबंधित वसतीगृहांशी करार करण्यात आला. प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर येथे विद्यार्थी येण्यास सुरुवात होणार असल्याची माहिती वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. बी.एस. खैरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
जळगाव येथे वैद्यकीय संकूल मंजूर झाल्यानंतर (मेडिकल हब) यासाठी १२०० कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहे. या संकुलात वैद्यकीय क्षेत्रातील वैद्यकीय, दंत चिकित्सा, आयुर्वेदीक, होमिओपॅथी, फिजिओथेरपी असे पाच शाखांचे शिक्षण येथे मिळू शकेल. या वैद्यकीय महाविद्यालयास जिल्हा रुग्णालयापासून सुरुवात होत असून त्यासाठी आवश्यक बाबींची पूर्तता करण्यात आली. प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी १०९ पदे भरण्याची प्रक्रिया करण्यासह अद्यायावत यंत्रसामुग्री, खोल्यांचे बांधकाम अशी कामे करण्यात आली.
राहण्याची सोय
विविध कामे तर करण्यात आली, मात्र येथे शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांची राहण्याचीही सोय व्हावी यासाठी वसतीगृह असणेदेखील गरजेचे आहे. त्यानुसार विविध कामांच्या पूर्ततेचाच भाग म्हणून वैद्यकीय शिक्षण विभागाच्यावतीने जळगावात वसतीगृहांची सोय करण्याचा निर्णय घेतला व त्यांची निवडदेखील करण्यात आली.
मुला-मुलींसाठी दोन स्वतंत्र वसतीगृह
वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी येणाºया विद्यार्थ्यांमध्ये मुला-मुलींसाठी दोन वसतीगृह घेण्यात आले आहेत. यामध्ये रेल्वे स्थानक परिसरात मुलांसाठी वसतीगृह राहणार असून येथे ५० विद्यार्थी राहू शकतात. या सोबतच महामार्गावर मानराज पार्कनजीक मुलींसाठी वसतीगृह राहणार असून त्या ठिकाणी १६८ मुली राहणयाची क्षमता आहे.
सामंजस्य करार
वरील दोनही वसतीगृहांशी वैद्यकीय महाविद्यालयाच्यावतीने सामंजस्य करार करण्यात आला आहे. भाडेतत्वावर ही वसतीगृह राहणार आहे. हा करार झाल्याने वसतीगृहाचाही प्रश्न सुटल्यान त्रुटी नसल्याचे सांगितले जात आहे.
विद्यार्थिनींसाठी येण्या-जाण्याची सोय
मुलींसाठी महामार्गावर घेण्यात आलेल्या वसतीगृहापासून वैद्यकीय महाविद्यालयात (जिल्हा रुग्णालय) येण्यासाठी येण्या-जाण्याची सोय राहणार आहे.
प्रक्रियेनंतर वसतीगृहात प्रवेश
सध्या वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेस सुरुवात झाली असून २ जुलैपासून जळगावात मुले हजर (रिपोर्ट करतील) होतील. त्यानंतर संपूर्ण जुलै महिना प्रवेश प्रक्रिया होऊन १ आॅगस्टपासून अभ्यासक्रमास सुरुवात होईल. त्यावेळी विद्यार्थ्यांना वसतीगृहात प्रवेश दिला जाऊन वसतीगृह ताब्यात येतील.
वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी दोन वसतीगृह घेण्यात आले असून याबाबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. प्रवेश प्रक्रियेनंतर मुले तेथे राहण्यास सुरुवात होईल.
- डॉ.बी.एस. खैरे, अधिष्ठाता, वैद्यकीय महाविद्यालय