ठेकेदाराला जिल्हा दूध संघाने काळ्या यादीत टाकावे, जळगाव जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघाच्या बैठकीत मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2018 12:32 PM2018-09-30T12:32:22+5:302018-09-30T12:33:09+5:30
डीपफ्रीजच्या विषयावरून नाराजी
जळगाव : जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघाच्या मासिक सभेत डीपफ्रीजमधील त्रुटीबाबत वारंवार सूचना देऊन सबंधीत ठेकेदारास व अधिकाऱ्यास पाठीशी घालण्यात येत असल्याच्या कारणावरून संचालक चिमणराव पाटील यांच्यासह काही संचालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. संबंधीत ठेकेदारास काळ्या यादीत टाका अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
चिमणराव पाटील संतापात निघून गेले
जिल्हा दूध उत्पादक संघाची मासिक सभा चेअरमन मंदाकिनी खडसे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी दुपारी झाली. बैठकीत संघाने खरेदी केलेल्या डीप फ्रीजरचा विषय चर्चेत आला असता त्यातील त्रुटीबाबत चिमणराव पाटील यांनी प्रश्न उपस्थित करून या विषयावर मागील बैठकीत चर्चा करून दखल घेतली गेली नाही. त्यामुळे दूध संघाचे नुकसान होत असल्याची भूमिका व्यक्त केली. ठेकेदाराला पाठीशी घातले जात असल्याचे सांगून त्याला काळ्या यादीत टाकले जावे अशा सूचना त्यांनी केल्या. मात्र प्रतिसाद न मिळाल्याने अखेर त्यांनी बैठकीतून काढता पाय घेतला.
जळगावात खाजगी दूध डेअरी चालकांचे आव्हान
दूध विक्रीत स्पर्धा वाढली आहे. खाजगी दूध डेअरी चालकांनी दूध संघापुढे आव्हान उभे केले आहे. दूध संघालाही या स्पर्धेत उतरावे लागेल व त्या दृष्टीने नियोजन व्हावे अशी अपेक्षा बैठकीत आमदार सुरेश भोळे यांनी व्यक्त केली. ग्राहकांना घरापर्यंत सेवा दिली पाहीजे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. संचालक एल.डी. चौधरी दूध उत्पादक संस्थाच्या सोयी सुुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याची भूमिका मांडत त्या उपलब्ध करून द्याव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली. यासह विविध विषयांवर बैठकीत चर्चा झाली.
३ अधिका-यांनी दिला राजीनामा
जिल्हा दूध संघात कंत्राटी कर्मचाºयांची संख्या वाढली असून राजकारणही वाढल्याची टीका काही संचालकांनी केली. ३ मोठ्या पदावरील अधिकाºयांनी कंटाळून नोकरीचा राजीनामा दिला आहे. याबाबतही काही संचालकांनी नाराजी व्यक्त केल्याचे वृत्त आहे.
बैठकीस आपण उपस्थित होतो. जिल्हा बॅँकेत काही कामे असल्यामुळे आपण चर्चा करून निघून गेलो. कोणताही वाद झाला नाही.
- चिमणराव पाटील, संचालक, दूध संघ.