जळगाव जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांना मिळणार कंत्राटी वैद्यकीय अधिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 12:57 PM2017-11-29T12:57:27+5:302017-11-29T12:59:23+5:30
रिक्तपदे भरण्याची प्रक्रिया सुरू
ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 29 - जिल्ह्यातील विविध शासकीय रुग्णालयांमधील रिक्तपदे भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून यामध्ये 40 पदे कंत्राटी पद्धतीने भरली जाणार आहे. यासाठी 5 डिसेंबर रोजी मुलाखत होणार आहेत.
आरोग्यसेवेतील रिक्त पदांमुळे जिल्ह्यातील रुग्णसेवेवर परिणाम होत आहे. गेल्या अनेक वर्षापासून डॉक्टरच मिळत नसल्याने रुग्णांचे हाल होत आहे. त्यामुळे आता राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत ही पदे भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यामध्ये स्त्री रोगतज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ, भूलतज्ज्ञ ही पदे कंत्राटी पद्धतीने ही पदे भरली जाणार आहेत.
यामध्ये जामनेर, मुक्ताईनगर येथील उपजिल्हा रुग्णालय, धरणगाव, एरंडोल, अमळनेर, भडगाव, रावेर, यावल बोदवड, पारोळा, चाळीसगाव,पहूर, पाल, वरणगाव येथे स्त्रीरोग तज्ज्ञ, जामनेर, मुक्ताईनगर येथील उपजिल्हा रुग्णालय, धरणगाव, एरंडोल, रावेर, यावल, बोदवड, पारोळा, चाळीसगाव पहूर, पाल, वरणगाव, मेहुणबारे, पाचोरा येथे बालरोगतज्ज्ञ आणि मुक्ताईनगर, भडगाव, धरणगाव, एरंडोल, रावेर, यावल, बोदवड, पारोळा, चाळीसगाव, मेहुणबारे,पहूर, पाचोरा येथे भूलतज्ज्ञांचे पदे भरली जाणार आहेत. त्यासाठी 5 डिसेंबर रोजी मुलाखती होणार आहेत. ही पदे भरल्याने जिल्ह्यात आरोग्य सेवेत सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.