निसर्गातून सीएमव्ही घालवण्यासाठी रसशोषक किडींचा प्रादुर्भाव होणारी कापूस व मका पिकांची दोन वर्ष लागवड थांबवा-डॉ.के.बी.पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2020 03:58 PM2020-08-30T15:58:37+5:302020-08-30T15:59:32+5:30
निसर्गातून सीएमव्ही घालवण्यासाठी रसशोषक किडींचा प्रादुर्भाव होणारी कापूस व मका पिकांची दोन वर्ष लागवड थांबवा.
रावेर : निसर्गातून सीएमव्ही (कुक्कुंबर मोझॅक व्हायरस) घालवण्यासाठी रसशोषक किडींचा प्रादुर्भाव होणारी कापूस व मका पिकांची दोन वर्ष लागवड थांबवा, असे आवाहन आंतरराष्ट्रीय केळी तज्ज्ञ डॉ.के.बी.पाटील यांनी केले आहे.
स्वातंत्र्योत्तर काळात ब्रिटिश सरकारने केळी लागवडीखालील नवीन केळीबागांवर आक्रमण करणाऱ्या कुक्कुंबर मोझॅक व्हायरसच्या निर्र्मूलनासाठी सतत वर्षे केळी लागवडीवर निर्बंध घातले होते. आता मात्र केळी लागवड थोपवणे शक्य नाही. असे असले तरी निसर्गातून सीएमव्हीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी रसशोषक किडींचे आश्रयस्थान असलेल्या खरीपातील मका व कापूस पिकांची सतत दोन वर्षे लागवड थांबवावी. आपापल्या गावशिवारात सबंध शेतकऱ्यांनी शेताच्या बांधावरील व गाडीरस्ते तणमुक्त करण्यासाठी ‘एक शिवार - एक फवारणी’ अशी तणमुक्त शेतीशिवाराचे एकात्मिक कीड नियंत्रण अभियान राबविण्याची गरज असल्याचे मत डॉ.के.बी.पाटील यांनी व्यक्त केले आहे.
सन २००१ व २००२ मध्ये तालुक्यातील केºहाळे बुद्रूक व बºहाणपूर तालुक्यातील दापोरा येथे तद्नंतर सन २०१२-१३ व मागील वर्षी सावखेडा, चिनावल, वाघोदा, निंभोरा, विवरे शिवारात या सीएमव्ही रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्याची माहितीही त्यांनी दिली.
गत पंधरवड्यातील ढगाळ वातावरणातील पावसाची झिमझिम सुरूच राहिल्याने केळीबागांचे बांधावरील तथा नदीनाले व शिवार रस्त्याच्या कडेवरील तणांपासून, वेलवर्गीय पिकांपासून प्रादुर्भाव होणाºया मावा, तुडतुडे, थ्रिप्स, फुलकिडे, पांढरी माशी या रसशोषक किडींचा प्रसार झपाट्याने झाला. यामुळे तालुक्यातील हजारो हेक्टर क्षेत्रात सीएमव्हीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्या पार्श्वभूमीवर केळी उत्पादक शेतकºयांनी सामूहिकरित्या सीएमव्हीच्या समूळ उच्चाटनासाठी एक शिवार एक फवारणी बांधावरील तथा नदीनाले व शिवार रस्त्याच्या कडेवरील तण नाहीसे करण्यासाठी तणनाशकांची तथा केळी बागांमध्ये रसशोषक किड नियंत्रणासाठीची फवारणी एकाचवेळी करण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
रावेर तालुक्यातील ८२ गावातील २ हजार ४९५ शेतकºयांच्या १ हजार ८३५ हेक्टर क्षेत्रातील नवीन लागवडीखालील केळी बागा कुक्कुंबर मोझॅक व्हायरसने बाधित झाल्याचा प्राथमिक अंदाज प्रभारी तालुका कृषी अधिकारी विजय महाजन व तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी जिल्हा प्रशासनाकडे सादर केला आहे. ४० ते ४५ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज जाणकारांकडून व्यक्त केला जात आहे.