कमी वेळात अधिक माल विक्रीच्या लगबगीत भाजीपाला नियंत्रणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:15 AM2021-05-10T04:15:27+5:302021-05-10T04:15:27+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गेल्या काही दिवसांपासून मोठी भाववाढ असलेल्या खाद्यतेलाचे भाव अजूनही चढेच आहे तर इतर किराणा ...

Controlling vegetables to sell more goods in less time | कमी वेळात अधिक माल विक्रीच्या लगबगीत भाजीपाला नियंत्रणात

कमी वेळात अधिक माल विक्रीच्या लगबगीत भाजीपाला नियंत्रणात

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : गेल्या काही दिवसांपासून मोठी भाववाढ असलेल्या खाद्यतेलाचे भाव अजूनही चढेच आहे तर इतर किराणा साहित्याचे भाव मात्र स्थिर आहे. दुसरीकडे कोरोना निर्बंधामुळे किराणा, भाजीपाला विक्री यांच्या वेळांवरही निर्बंध आल्याने कमी वेळात अधिक माल विक्री करण्याच्या प्रयत्नात भाजीपाल्याचे दर ऐन उन्हाळ्यात नियंत्रणात आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून चढ-उतार होत असलेल्या खाद्य तेलामध्ये सलग दोन आठवडे मोठी भाववाढ झाली. ती अजूनही कायम आहे. यात तीन आठवड्यांपूर्वी सोयाबीन तेलात भाववाढ होऊन ते १४० ते १४५ रुपये प्रति किलोवर पोहोचले होते. त्यानंतर दोन आठवड्यांपूर्वी त्यात पुन्हा वाढ होऊन सोयाबीन तेलाचे भाव १५० रुपये प्रतिकिलोवर पोहोचले. शेंगदाण्याच्या तेलातही भाववाढ होऊन ते १८० ते १९० रुपये प्रतिकिलोवर पोहोचले. तसेच सूर्यफूल तेलाच्याही भावात वाढ होऊन ते १७५ ते १८० रुपये प्रतिकिलोवर पोहोचले. खाद्य तेलातील ही भाववाढ अजूनही कायम आहे.

इतर वस्तू स्थिर

दोन आठवड्यांपूर्वी डाळींचे भावदेखील वाढले व हरभरा डाळीच्या भाववाढीने बेसनपीठदेखील वधारून ते ८० ते ९० रुपये प्रतिकिलोवर पोहोचले. हे भावदेखील कायम आहे. मात्र साखर ३६ रुपये प्रतिकिलोवर स्थिर असून रवा ३५ ते ४० रुपये तर मैदा ३५ ते ३८ रुपये प्रतिकिलोवर व इतरही किराणा मालाचे भाव स्थिर आहे.

टमाटे १० रुपयांवर

सध्या उन्हाळा सुरू झाला असला तरी भाजीपाल्याचे भाव अजूनही स्थिर आहे. कोथिंबीर ४० रुपये किलो तर मेथीही ४५ रुपये किलोवर आहे. टमाट्याचे भाव तर कमी होऊन १० रुपये प्रति किलोवर आले आहे.

लसण खातोय भाव

गेल्या काही दिवसांपासून बटाट्याचे भाव कमी होऊन ते २० रुपये प्रति किलोवर आहेत. यासोबतच कांद्याचे भावदेखील कमी होऊन ते २० रुपये प्रतिकिलोवर आले आहे. मात्र कोरोनामुळे लसण, लिंबू यांना मागणी वाढल्याने त्यांचे भाव वाढत आहे. लसण १०० ते १४० रुपये तर लिंबू ६० रुपये प्रति किलोवर पोहचले आहे.

खाद्यतेलाचे भाव कमी होत नसल्याने आर्थिक भार कायम आहे. भाजीपाल्याचे भाव स्थिर असल्याने दिलासा आहे.

- दिलीप सोनवणे, ग्राहक

खाद्यतेलाच्या भाव वाढलेलेच असून इतर किराणा साहित्याचे भाव स्थिर आहे. सध्या निर्बंधामुळे मागणी वाढली असली तरी भाव स्थिर आहे.

- सचिन छाजेड, व्यापारी

सध्या भाजीपाल्याची आवक चांगली असल्याने त्यांचे भाव स्थिर आहे. लिंबू, लसण यांच्या भावात काहीसी वाढ आहे.

- रमेश वाणी, भाजीपाला विक्रेते

Web Title: Controlling vegetables to sell more goods in less time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.