गावठाण मोजणीवरुन वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2019 10:09 PM2019-12-20T22:09:44+5:302019-12-20T22:10:38+5:30

पथराळेची घटना : विरोध करणाऱ्यांविरुद्ध ग्रामस्थांची तहसीलदारांकडे धाव

Controversy over Gothan count | गावठाण मोजणीवरुन वाद

गावठाण मोजणीवरुन वाद

Next


यावल : तालुक्यातील स्थलांतरीत गाव असलेले पथराळे येथील शासनाने संपादन केलेल्या गावठाणाची हद्द शुक्रवारी निश्चित करण्यासाठी आलेल्या भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांशी थोरगव्हाण येथील पाच जणांनी वाद घातला. यामुळे या मोजणीला अडथळा आल्याने शिरागड/ पथराळे गृप ग्रामपंचायतीच्या सरंपचासह पथराळे येथील सुमारे १०० ग्रामस्थांनी यावल येथील पो. नि. रविकांत सोनवणे व तहसीलदार जितेन्द्र कुवर यांना निवेदन सादर केले.
तालुक्यातील पथराळे हे गाव सन १९५९ मध्ये तापी नदीच्या पुरामुळे स्थलांतरीत केले आहे. शासनाने संपादन केलेल्या गावठाणावर बेघारांसाठी प्लॉट देण्यासाठी थोरगव्हान/ पथराळे गृप ग्रामपंचायतीच्या वतीने गावठान हद्द निश्चितीसाठी भूमी अभिलेखा कार्यालयाकडे अर्ज केला होता त्याुनसार भुमी अभिलेखा कार्यालयाचे दोन कर्मचारी मोजणीसाठी गावठाणावर आले होते. दरम्यान ग्रामसेवक भरत पाटील यांनी याबाबत नेमके प्रकरण काय आहे यांसाठी तहसीलदार , गटविकास अधिकारी यांचे मार्गदर्शन घेवून पुढील निर्णय ग्रामपंचायत घेईल, असे सांगितले.
तर मोजणीस विरोध करणाºयाविरुद्ध निवेदन देण्यासाठी सरंपचा योगीता प्रताप सोनवण, प्रताप सोनवणे, गणेश धिवर, अविनाश धिवर, ईश्श्वर भालेराव, मधुकर सुरवाडे, यांचेसह सुमारे १०० च्या वर ग्रामस्थ येथे आले होते.
सदर निवेदनावर अडीचशे ग्रामस्थांच्या सहया आहेत.
दरम्यान शासनाने जमीन बेकायदेशीर संपादन केल्याचे चोधरी कुटुंबियांचे म्हणणे असून न्यायालयाचा आमचे बाजुने निकाल लागला आहे. तहसीलदार कार्यालयाकडून फेरफारसाठी आमचे प्रकरण प्रलंबीत असल्याचे सांगीतले.

Web Title: Controversy over Gothan count

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.