जळगाव येथे पेट्रोल, गॅस दरवाढीविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चुलीवर स्वयंपाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 01:12 PM2018-01-31T13:12:13+5:302018-01-31T13:14:40+5:30

काँग्रेसच्यावतीने बैलगाडी मोर्चा

Cooking front of the Collector's office in Jalgaon | जळगाव येथे पेट्रोल, गॅस दरवाढीविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चुलीवर स्वयंपाक

जळगाव येथे पेट्रोल, गॅस दरवाढीविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चुलीवर स्वयंपाक

Next
ठळक मुद्देशासनाचा निषेधसरकारवर  जोरदार टिका करत घोषणाबाजी

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 31 - पेट्रोल दरवाढीसह जीवणावश्यक वस्तुंच्या महागाई विरोधात जळगाव ताुलका काँग्रेसच्यावतीने शहरातून बैलगाडी मोर्चा काढण्यात आला.  मोर्चाचे नेतृत्व तालुकाध्यक्ष संजय वराडे यांनी केले.
शहरातून निघालेल्या या मोर्चाने जिल्हाधिकारी कार्यालयावर  धडक दिली. या वेळी जिल्हा प्रशासनास निवेदन देण्यात आले. प्रसंगी शहरातील जागोजागीमाजी मादी सरकारवर  जोरदार टिका करत घोषणाबाजी करण्यात आली.  दिवसेंदिवस वाढत असलेल्या पेट्रोल दरवाढीने सामान्य नागरीकांचे कंबरडे मोडले असून इंधन दरवाढीमुळे महागाई वाढत असल्याचे सांगण्यात आले.  कार्यकत्यार्ंन्ी शासनाचा निषेध केला आहे.   या वेळी ज्ञानेश्वर कोळी, राहुल पाटील, दीपक पाटील, मनोज चौधरी, बापू नेरकर यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते मोठया संख्येने सहभागी झाले होते.
चुलीवर स्वयंपाक
गॅस दरवाढी विरोधात सरकारचा निषेध म्हणून कार्यत्र्याच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चूल मांडून स्वयंपाक करण्यात आला. 

Web Title: Cooking front of the Collector's office in Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.