शिक्षक भारती संघटनेची सहविचार सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 11:23 PM2019-09-24T23:23:51+5:302019-09-24T23:23:56+5:30
पारोळा : तालुका शिक्षक भारती संघटनेची सहविचार सभा विकास हॉल येथे २२ रोजी झाली. या प्रसंगी नवीन कार्यकारिणीची निवड ...
पारोळा : तालुका शिक्षक भारती संघटनेची सहविचार सभा विकास हॉल येथे २२ रोजी झाली. या प्रसंगी नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली.
प्रथम प्रास्ताविक प्रवीण पाटील यांनी केले. यावेळी जिल्हाध्यक्ष सोमनाथ पाटील, माध्यमिकचे नारायण वाघ, माजी जिल्हाध्यक्ष अजयकुमार पाटील यांचे स्वागत केले. गुुणवंत शिक्षक पुरस्कारप्राप्त लोणी ग्रुप शाळेचे मुख्याध्यापक प्रवीण पवार यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते झाला.
गुणवंत पाटील, गोपाल पाटील, दीपक गिरासे, जयप्रकाश सूर्यवंशी उपस्थित होते. नवीन कार्यकारिणीत सचिन देशमुख तालुकाध्यक्ष, राजेंद्र शिंदे कार्याध्यक्ष, राजेंद्र मनोरे उपाध्यक्ष, शरद वाणी ज्येष्ठ सल्लागार, संजू चव्हाण सरचिटणीस तर विनोद पाटील यांची सचिवपदी निवड झाली.
यावेळी गजानन पाटील, पंकज गरुड, नितीन साठे, नाना माळी, शेख शरीफ, रवींद्र पाटील, गोपाल पाटील, गुणवंत पाटील, दीपक गिरासे, जयप्रकाश सूर्यवंशी, नरेंद्र पाटील, किरण पाटील, हेमंत पाटील, ईश्वर धोबी, समाधान पाटील, निलेश पाटील, शरद वाणी, प्रवीण पवार, देवीदास पाटील, राहुल देसले, हेमराज पवार, दगडू पाटील, संजू बंजारी, सचिन देशमुख, राजेंद्र मनोरे, राजेंद्र शिंदे, विनोद पाटील, प्रवीण पाटील आदी शिक्षक उपस्थित होते. सूत्रसंचालन शरद वाणी यांनी केल. दगडू पाटील यांनी आभार मानले.