समन्वयक अधिकारी सोडविणार समस्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:15 AM2021-03-22T04:15:07+5:302021-03-22T04:15:07+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोविड बाधितांवर उपचार करणाऱ्या रुग्णालयांमध्ये नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी, आस्थापनांमध्ये समन्वय राखण्यासाठी तीन ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोविड बाधितांवर उपचार करणाऱ्या रुग्णालयांमध्ये नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी, आस्थापनांमध्ये समन्वय राखण्यासाठी तीन समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव येथे उपजिल्हाधिकारी किरण पाटील, गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय जळगाव येथे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डिगंबर लोखंडे आणि इकरा युनानी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय जळगाव येथे उपजिल्हाधिकारी प्रसाद मते यांची समन्वयक (नोडल) अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
कर्मचाऱ्यांची उपस्थिती, स्वच्छता, जेवणाची सुविधा व इतर सुविधांच्या अनुषंगाने उद्भवणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी, संबंधित आस्थापनेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना आवश्यक सोईसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आणि समन्वय राखण्यासाठी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी समन्वयक अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. हे नोडल अधिकारी संबंधित आस्थापनेशी समन्वय साधून नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी आवश्यक कार्यवाही करतील, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.