इंग्रजीच्या पेपरला कॉप्यांचा पाऊस

By admin | Published: March 1, 2017 12:10 AM2017-03-01T00:10:31+5:302017-03-01T00:10:31+5:30

बारावी परीक्षा : 42 विद्याथ्र्यानी मारली परीक्षेला दांडी, शहरात सहा केंद्र

The copies of the English paper | इंग्रजीच्या पेपरला कॉप्यांचा पाऊस

इंग्रजीच्या पेपरला कॉप्यांचा पाऊस

Next

भुसावळ : बारावी परीक्षेला मंगळवार, 28 पासून प्रारंभ झाला़ पहिल्याच दिवशी इंग्रजीच्या पेपरला शहरातील डी़एस़हायस्कूलमध्ये कॉप्यांचा अक्षरश: पोलीस बंदोबस्तातच पाऊस पडला तर अन्य केंद्रावर मात्र कॉपी पुरवणा:यांना पोलिसांच्या लाठीचा प्रसादही मिळाला़   बारावी परीक्षेसाठी शहरात एकूण सहा केंद्र आहेत तर तीन हजार 429 परीक्षार्थी यावेळी प्रविष्ट होत़े त्यातील तीन हजार 387 विद्याथ्र्यानी मंगळवारी इंग्रजीचा पेपर दिला तर 42 विद्यार्थी अनुपस्थित असल्याचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी विजय पवार म्हणाल़े
मंगळवारपासून बारावी परीक्षांना प्रारंभ झाल्याने शहर व बाजारपेठ हद्दीतील परीक्षा केंद्रावर पोलिसांसह होमगार्डचा कडेकोट बंदोबस्त आहे मात्र पोलिसांच्या बंदोबस्तातच विद्याथ्र्यानी आपल्या मित्रांना कॉपी पुरवली़
4डी़एस़हायस्कूलमध्ये सर्वाधिक कॉपीचा पाऊस पडला़ पोलिसांची नजर चुकवत कॉपी पुरवणा:यांनी श्यामप्रसाद मुखर्जी उद्यानासह वाचनालयाच्या टेरेसवरून विद्यार्थी मित्रांर्पयत कॉपी पुरवली़
4आरपीडी रोडवरील श्री संत गाडगेबाबा विद्यालयात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त दिसून आला़ कॉपी पुरवण्याचा प्रयत्न होताच पोलिसांकडून त्यांना लाठीचा प्रसाद दिला जात होता विद्यालयात सीसीटीव्ही बसवल्याने कुणीही फिरकले नाही तर गस्तीवरील पोलीस कॉपी बहाद्दरांना लाठीने पिटाळून लावत असल्याचे चित्र  होत़े
सहा केंद्रावर भरारी पथकाची भेट
शहरातील पु़ओ़नाहाटा महाविद्यालयासह क़ेनारखेडे, डी़एस़हायस्कूल, डी़एल़हिंदी विद्यालय, श्री संत गाडगे महाराज, बी़ङोड़उर्दू हायस्कूल या सहा केंद्रावर चार भरारी पथकाने मंगळवारी भेट दिली मात्र कुठेही कारवाई झाली नसल्याचे सांगण्यात आल़े
विद्याथ्र्यासोबत पालकांचीही परीक्षा
बारावीची परीक्षा म्हणजे आयुष्याचा टर्निग पॉईंटच़ विद्याथ्र्यासोबत पालकांचीदेखील ही एक प्रकारे परीक्षाच़ परीक्षा केंद्रार्पयत आलेले पालक व शेवटच्या क्षणार्पयत हातात असलेल्या पुस्तकातील उजळणीनंतर एकमेकांना शुभेच्छा व बेलनंतर वेळेआधी दहा मिनिटे हातात पडलेली प्रश्नपत्रिका अशा वातावरणात परीक्षेला सुरुवात झाली़

Web Title: The copies of the English paper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.