कोरोनामुळे नागरिकांच्या ‘मॉर्निंग वॉक’मध्येही खंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2020 01:21 PM2020-05-18T13:21:56+5:302020-05-18T13:22:08+5:30
बंदी असल्याने अनेकांचे गच्ची, अंगणातच फिरणे : स्थूलपणा येत असल्याच्या नागरिकांच्या प्रतिक्रिया
जळगाव : सकाळीच उठून चालायला जाणे, ही उत्तम आरोग्याची खरंतर गुरुकिल्ली मानली जाते. मात्र ‘मॉर्निंग वॉक’चे एवढे फायदे असूनही कोरोनाच्या भीतीने सध्या जळगावकरांनी ‘मॉर्निंग वॉक’कडेच पाठ फिरवली आहे. तसे पाहता लॉकडाउनमुळे ‘मॉर्निंग वॉक’वरही बंदी घालण्यात आली आहे. त्याचे अनेक जण पालन करीत आहेत तर अनेक जण कोरोनाच्या धास्तीने बाहेर पडत नाही. मात्र काही जण सकाळी बाहेर फिरत असल्याने हाताच्या बोटावर मोजता येतील, एवढेच नागरिक सकाळी फिरण्यासाठी निघत असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या सर्व्हेक्षणातून दिसून आले.
सूर्य उजाडण्यापूर्वीच घराबाहेर पडून चालणे (वॉकींग करणे), ही तर अनेकांची सवय आहे. आरोग्यासाठी ती एक उत्तम सवय मानली जाते. त्यामुळे आरोग्याच्या अनेक तक्रारी दूर होतात. मात्र कोरोनाच्या फैलावामुुळे अनेकांची जीवनशैलीच बदलून गेली आहे.
कोरोनाचा आजार पसरल्यानंतर ‘मॉर्निंग वॉक’ करणाऱ्यांच्या संख्येवर कितपत परिणाम झाला आहे, याबाबत लोकमतने सर्व्हेक्षण केले.
- वाटिकाश्रमहून बिबानगरकडे जाणाºया मार्गावर काही दिवसांपूर्वी अनेक लोक मॉर्निंग वॉकसाठी फिरायला निघत असत. मात्र आता केवळ दोन ते तीन लोकच फिरायला निघतात. त्यापेक्षा अनेक नागरिकांनी रात्रीचे जेवण घेतल्यानंतर जवळच्याच भागात पायी फेरफटका मारण्यावर भर दिला आहे.
- प्रेमनगर : रविवारी सकाळी ६ ते ७ वाजे दरम्यान पिंप्राळा व प्रेमनगर रस्त्यावर पाहणी केली असता पाच ते सहा जण मॉर्निंग वॉक करताना आढळले तर चार ते पाच जण शिवकॉलनी पुलाशेजारी मोकळ्या मैदानात व्यायाम करताना दिसून आली़ नागरिक मॉर्निक वॉल्क करताना दिसून आले़
- प्रेमनगर : नवीन बस स्थानक परिसरातील आकाशवाणी चौकाकडे जाणारा रस्त्यासह पांडे डेअरी, कोर्ट चौक व बहिणाबाई उद्यानाकडे जाणाºया रस्त्यावर पाहणी केली. आकाशवाणी चौकाकडे जाणारा व कोर्ट चौकाकडे येणाºया रस्त्यावरच नागरिक फिरताना दिसून आले. इतर रस्त्यावर एकही व्यक्ती नव्हता.
- प्रेमनगर : नेहरु चौकातून टॉवर चौकाकडे जाणाºया रस्त्यावर मात्र बºयापैकी नागरिक फिरताना आढळून आले. यामध्ये महिलांचा देखील समावेश होता. दोन्ही बाजूच्या रस्त्यावर पाच ते सहा नागरिक दिसून आले. सातपर्यंत फिरणाऱ्यांची गर्दी होती. कोरोनामुळे खान्देश सेंट्रल मॉलमध्ये व्यायामासाठी प्रवेश नसल्याने, हे नागरिक रस्त्यावरच एका बाजूला शारिरीक हालचाली करुन, व्यायाम करतांना दिसून आले.
पिंप्राळा आणि परिसरात सकाळ आणि संध्याकाळ पायी फिरणाºयांची मोठी गर्दी असते. आता सायंकाळी आपल्या घराच्या गच्चीवर लोक फिरतांना दिसत आहेत. दुसरीकडे सायंकाळी रस्त्यावर फिरणारे नागरिकांची संख्या मात्र काही प्रमाणात वाढली आहे.