कोरोनामुळे चाळीसगाव तालुक्यातील ७६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीला ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2020 08:22 PM2020-06-06T20:22:12+5:302020-06-06T20:22:41+5:30

निवडणुका सहा महिने पुढे ढकलल्या जाणार

Corona breaks 76 Gram Panchayat elections in Chalisgaon taluka | कोरोनामुळे चाळीसगाव तालुक्यातील ७६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीला ब्रेक

कोरोनामुळे चाळीसगाव तालुक्यातील ७६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीला ब्रेक

Next


चाळीसगाव : कोरोना विषाणुच्या प्रादुभार्वाच्या पार्श्वभूमीवर आगामी काळात ग्रामपंचायतींच्या निवडणूकींना राज्य सरकारने स्थगिती दिली आहे.त्यामुळे या निवडणूका सहा महिने पुढे ढकलल्या जाणार आहेत. त्याचा फटका चाळीसगाव तालुक्यातील ७६ ग्रामपंचायतींना बसणार आहे.
तालुक्यात येत्या आॅगस्टमध्ये मुदत संपणाऱ्या ७६ ग्रामपंचायतींच्या निवडणूका आगामी काळात अपेक्षीत होत्या. त्यामुळे संबंधीत गावांमधील राजकीय वातावरण ढवळून निघणार होते ते थंडावणार आहे. मात्र कोरोनोच्या प्रादुर्भाव वाढत असल्याने ग्रामपंचायतीच्या निवडणुका लांबल्याने इच्छुकांचा हिरमोड झाला आहे. दरम्यान निवडणूका स्थगिती होणाºया ग्रामपंचायतींमध्ये विद्यमान सत्ताधाऱ्यांना मुदतवाढ मिळते की प्रशासक बसतो याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.
चाळीसगाव तालुक्यातील आॅगस्टमध्ये मुदत संपणाºया ७६ ाग्रामपंचायती अशा- कळमडू, भामरे बुद्रूक, चांभार्डी खुर्द, चांभार्डी बुद्रूक, हातले, जामडी प्र. बहाळ, रोकडे, वाघले, वाकडी, वाघडू, पिंप्री खुर्द, देवळी, शिंदी, बिलाखेड, अलवाडी, डोणदिगर, तळोंदे प्र.दे., खरजई, टाकळी प्र.चा., दसेगाव, रोहीणी, ओढरे, घोडेगाव, राजदेहरे, हातगाव, पिंपळगाव, तिरपोळे, वरखेडे बुद्रूक, पळासरे, वाघळी, मुंदखेडे खुर्द, मुंदखेडे बुद्रूक, तामसवाडी, तळोंदे प्र.चा., कुंझर, पोहरे, भऊर, जामदा, भवाळी, खडकी बुद्रूक, कोदगाव, पाटणा, दस्केबर्डी, हिंगोणे खुर्द, खेडी खुर्द, नांदे्र, मांदुर्णे, पिलखोड, सायगाव, देशमुखवाडी, पिंपळवाड निकुंभ, शिरसगाव, टाकळी प्र.दे., तमगव्हाण, टेकवाडे खुर्द, बहाळ, धामणगाव, गोरखपूर, चितेगाव, जुनोने, बोरखेडा बुद्रूक, रहिपुरी, वडगाव लांबे, तरवाडे, पिंप्री बुदूक प्र.दे., ब्राम्हणशेवगे, लोंढे, खडकीसीम, बेलदारवाडी, तांबोळे बुद्रक, भोरस बुद्रक, बाणगाव, रांजणगाव, बोढरे या गावांचा समावेश आहे.

Web Title: Corona breaks 76 Gram Panchayat elections in Chalisgaon taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.