कोरोना बाधिताचा मृतदेह घेऊन फिरफीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2020 01:03 PM2020-05-31T13:03:42+5:302020-05-31T13:04:05+5:30

मेहरुणमध्ये अंत्यविधीस नकार

Corona carrying the victim's body | कोरोना बाधिताचा मृतदेह घेऊन फिरफीर

कोरोना बाधिताचा मृतदेह घेऊन फिरफीर

Next

जळगाव : शहरातील कंजरवाडा भागात आढळेल्या एका कोरोना बाधित रूग्णाचा शनिवारी दुपारी मृत्यू झाला़ कोविड कक्ष ते मेहरूण स्मशानभूमी फिरल्यानंतर अखेर नेरीनाका स्मशानभूमीत त्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले़ चक्क पाउण ते एक तास मृतदेहाला अंत्यसंस्काराची वाट शोधावी लागल्याचा प्रकार शनिवारी सायंकाळी घडला़ दरम्यान, या प्रकारामुळे कुणाला बाधा झाल्यास त्यास जबाबदार कोण? असा सवाल काही नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे़
शहरातील कंजरवाडा परिसरात आतापर्यंत पाच कोरोना बाधित रूग्ण आढळून आले़ त्यात सर्वात आधी आढळून आलेल्या कोरोना बाधित वृध्दाचा शनिवारी मृत्यू झाला़ सायंकाळी हा मृतदेह कुटूंबीयांना सुपूर्द करण्यात आला़ नंतर तो मृतदेह शववाहिकेतून थेट मेहरूण स्मशानभूमीत नेण्यात आला़ मात्र, त्याठिकाणी कोरोना बाधीत व्यक्तीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार होत नसून नेरीनाका स्मशानभूमीत कोरोना बाधितांवर अंत्यविधीची प्रक्रिया केली जात असल्याचे नातेवाईकांना सांगण्यात आले.
पुन्हा ती शववाहिका नेरीनाका स्मशानभूमीच्या दिशेने निघाली़ शहरभरात वेगवेगळ््या भागात मृतदेह फिरल्यानंतर अखेर नेरीनाका स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले़ या प्रकारामुळे अनेकांनी नाराजी व्यक्ती केली़ रुग्मालय प्रशासनाच्या भोंगळ काराभाराबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली़ तसेच कंजरवाडा भागाकडे दुर्लक्ष केले जात असल्याचेही एका सामाजिक कार्यकत्याने आरोप केला असून या पुढे असे प्रकार होणार नाही, यासाठी दभता घेण्याची मागणी केली.

Web Title: Corona carrying the victim's body

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव