कोरोनाच्या संकटात केळी व्यापाऱ्यांनी दिली प्रतिक्विंटल हजार रू.ची शेतकऱ्यांच्या खिशाला चाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2020 05:40 PM2020-05-09T17:40:11+5:302020-05-09T17:41:30+5:30

बाजारभाव समितीच्या भावापेक्षा २०० ते २५० रू. कमी भावाची तडजोड करा म्हणजे व्यापाºयांची गाडी बांधावर उभी राहतेय.

In the Corona crisis, banana traders licked farmers' pockets at Rs 1,000 per quintal | कोरोनाच्या संकटात केळी व्यापाऱ्यांनी दिली प्रतिक्विंटल हजार रू.ची शेतकऱ्यांच्या खिशाला चाट

कोरोनाच्या संकटात केळी व्यापाऱ्यांनी दिली प्रतिक्विंटल हजार रू.ची शेतकऱ्यांच्या खिशाला चाट

Next
ठळक मुद्देकेळीमालाला उठाव जोमातबाजारभाव समितीच्या भावापेक्षा २०० ते २५० रू. कमी भावाची तडजोड करा म्हणजे व्यापाºयांची गाडी बांधावर उभी राहतेय

किरण चौधरी
रावेर, जि.जळगाव : गत वर्षीच्या दुष्काळाच्या राखेतून अग्नीपंख घेऊन फिनिक्स पक्षाप्रमाणे झेप घेण्याची आशा उराशी बाळगून असलेल्या केळी उत्पादक शेतकºयांंना यंदा मात्र कोरोनाच्या लॉकडाऊनचा गैरफायदा घेऊन चैत्र नवरात्रोत्सव व रमजान ईदचे पर्व येवूनही व केळीमालाची उपलब्धता अत्यंत कमी प्रमाणात आहे. असे असतानाही केळी व्यापाºयांनी २२ मार्च ते आजतागायत ४७ ते ४८ दिवसात शेतकºयांच्या खिशाला किमान प्रतिक्विंटल एक हजार रूपयांची चाट लावली आहे. या ४७ दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये दररोज सरासरी किमान २५० ट्रक तालुक्यातून निर्यात होत असल्याचे गृहित धरता १ लाख ८८ हजार क्विंटल केळीमागे १८८ कोटींची निव्वळ उत्पादनाची चाट केळी उत्पादक शेतकºयांना अखेर बसल्याचे मोठे शल्य बोचणारे ठरले आहे.
गत वर्षी अत्यल्प व अनियमित पर्जन्यमानामुळे तालुक्यात दुष्काळाचे सावट होते. भूजल पातळी दररोज १०० मीटरने घसरल्याने हजारो हेक्टरमधील केळीबागा पाण्याअभावी तर ४७ ते ४८ सेल्सियस तापमानाची मजल मारलेल्या उन्हाच्या दाहकतेत होरपळून निघाल्या होत्या. किंबहुना त्याच कारणास्तव केळीची मृगबागेची पूर्वहंगामी लागवडीत कमालीची घट झाली होती.
केळीने कायापालट होण्याऐवजी व्यापाºयांनी केले भुईसपाट
परिणामी त्या घटत्या लागवडीखालील केळीबागांमधील अत्यल्प केळीमालाला यंदाच्या मार्च-एप्रिलपासून सुरू होणाºया केळी हंगामात किमान १२०० ते १३०० रू प्रतिक्विंटल भाव मिळणे अपेक्षित होते. किंबहुना, कोरोनाच्या लॉकडाऊनचा फतवा जारी होताच केळी व्यापाºयांनी ‘अभी नही तो कभी नही’ अशा एकाधिकार शाहीने केळी हे नाशवंत फळ असल्याने अवघ्या २५० ते ३०० रू प्रतिक्विंटल भावात केळीबागांच्या बख्खी (विळा) लावून केळीबागा आडव्या केल्या. दरम्यान, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यामार्फत लॉकडाऊनमधील मार्ग मोकळा केल्यानंतरही उत्तर भारतात केळी भरून गेलेले ट्रक खाली करायला मजूर उपलब्ध नाहीत, तिकडे गेलेल्या गाड्या परत येत नाहीत, रस्त्यात गॅरेज वा ढाबे उपलब्ध नाहीत. अशा एकनाविविध बहाण्यांनी किमान प्रतिक्विंटल एक हजार रुपये कमी दराने केळी बागांची सर्रास कत्तल सुरू होती.

पश्चिम बंगाल तथा सोलापूर स्थित असलेल्या केळी पॅकेजिंगचे तंत्रकुशल केळी कामगारांचा ताफा असता तर दरदिवशी १५ ते २० कंटेनर आखाती राष्ट्रात रवाना करून केळी उत्पादकांना अपेक्षित असलेल्या दीड हजार रू प्रतिक्विंटल केळीभाव पदरात टाकण्याची धन्यता लाभली असती
-सदानंद महाजन, केळी निर्यातदार शेतकरी, तांदलवाडी, ता.रावेर

Web Title: In the Corona crisis, banana traders licked farmers' pockets at Rs 1,000 per quintal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.