जिल्ह्यात सलग दुसर्या दिवशी कोरोना ९५० पार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:28 AM2021-03-13T04:28:47+5:302021-03-13T04:28:47+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गुरूवारी जिल्हाभरात ९५४ कोरोना बाधित आढळून आले आहेत. सहा बाधितांचा मृत्यू झाला असून गेल्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : गुरूवारी जिल्हाभरात ९५४ कोरोना बाधित आढळून आले आहेत. सहा बाधितांचा मृत्यू झाला असून गेल्या चार दिवसात २४ बाधितांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. वाढता संसर्ग रोखण्यासाठी जळगावात जाहीर करण्यात आलेल्या जनता कर्फ्युची अंमलबजावणी गुरूवारी रात्रीपासून करण्यात आली असून चोपडा व चाळीसगाव या दोन हॉटस्पॉटमध्येही शनिवार १३, रविवार १४ मार्च या दोन दिवसात निर्बंध लावण्यात आले आहेत.
चोपडा, चाळीसगावात दूध विक्री केंद्र, वैद्यकीय उपचार, सेवा, औषधी दुकाने, रुग्णवाहिकांची सेवा, आपत्ती व्यवस्थापनाशी संबधित घटक वगळून सर्व बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी काढले आहे.
जळगावात कोरोना संसर्ग वाढत असताना होम आयसोलेशनची परवानगी घेऊनही एका कुटुंबातील एक बाधित महिला थेट मॉर्निंग वॉकला तर बाधित मुले कंपनीत गेल्याचा गंभीर प्रकार समोर आल्याने या कुटुंबार गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मनपा प्रमुख वैद्यकीय अधिकारी राम रावलानी यांनी दिली.