कोरोना रुग्णांची सेवा करतेय भुसावळची कन्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2020 04:59 PM2020-10-10T16:59:07+5:302020-10-10T16:59:32+5:30
भुसावळ येथील कन्या डॉ.यामिनी संजय इंगळे ही पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार करून त्यांची सेवा करीत आहे.
Next
भुसावळ : पुणे येथील भारती विद्यापीठ वैद्यकीय महाविद्यालयामधील कोविड रुग्णालयात गेल्या सहा महिन्यांपासून भुसावळ येथील कन्या डॉ.यामिनी संजय इंगळे ही पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार करून त्यांची सेवा करीत आहे. कोणतीही पर्वा न करता तिने सातत्याने हे काम सुरू ठेवले आहे.
यामिनीचे एम.बी.बी.एस.चे शिक्षण झाले असून त्या हॉस्पीटलमध्ये सेवेत असल्याने तेथे अहोरात्र कोरोना योध्दा म्हणून काम करीत आहे. तिचे त्याकरीता सर्वत्र कौतुक होत आहे. डॉ.यामिनी ही के.वाय.टी.एस.सी.टी. कॉलेज आॅफ फार्मसी साकेगावचे सचिव संजय पंडित इंगळे यांची कन्या आहे.